
नाशिक : संगिनी महिला जागृती मंडळ नाशिक आयोजित नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने आम्हीं सावित्रीच्या लेकी या मुलाखत सत्रात आज फॅमिली कोर्टच्या जेष्ठ वकील श्रीमती पूनम किरण तांबट यांची मुलाखत संगिनीच्या सभासद सदस्य श्रीमती आशा हसे यांनी घेतली बालपणा पासून तर आज पर्यंत चा त्यांचा जीवन पट आपली खास प्रश्नोत्तराच्या शैलीत आशा हसे यांनी टिपला यावेळी पूनम तांबट यांनी आपल्या आजच्या यशस्वी जीवनाचे श्रेय आपले आई वडील आणि सासरच्या व्यक्तींना दिले.आपल्या 23 वर्षाच्या कारकिर्दीत आपण कामाच्या प्रति एकनिष्टता प्राणिकपणा आणि विश्वासार्यता या सोबत माणूसपण टिकवणं गरजेचे आहे असं त्या म्हणाल्या कल्याणी आहिरे यांनी आभार व्यक्त केले तर गीताताई गायकवाड यांनी संगीनीच्या वतीने सन्मान चिन्ह पुस्तिका देऊन पूनम तांबट यांचा सत्कार केला.हर्षाली देवरें मनोहर आहिरे यांनीही यावेळी प्रश्न विचारून शंका समाधान केले.
