
मनमाड : ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन अतिरिक्त मंडळ, मनमाड ची मासिक बैठक झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी मनमाड वर्कशॉप मधील रेल्वे कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या वर यावेळी चर्चा करण्यात आली.तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने व धर्मातर घोषणांच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम चे आयोजन करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
तसेच कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या वर चर्चा करण्यासाठी कारखाना प्रबंधक साहेब यांच्या शी चर्चा करण्यात येईल असे यावेळी निश्चित करण्यात आले.यावेळी , झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविण अहिरे, विजय गेडाम, कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड, वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे, ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे सचिव संदीप धिवर,अतिरिक्त सचिव रमेश पगारे, कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड, कार्यकारिणी सदस्य शरद झोंबाड, किरण वाघ, संदिप पगारे, सुनिल सोनवणे आदी पदाधिकाऱ्यांनी आपल्या शॉप मधील समस्या भाषणातून सांगितले.कार्यक्रमाचे आयोजन बहुजन युवक संघ चे अध्यक्ष रोहित भोसले, सचिव नवनाथ जगताप, राहुल शिंदे, गौतम एळीजे, प्रेमदिप खडताळे, अर्जुन बागुल, सतिश झाल्टे, आनंद पारखे, सतिश खेडेकर आदी ने केले.यावेळी प्रोजेक्ट मॅनेजर अभिजित रॉय यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे केक कापून साजरा करण्यात आला.
