
मनमाड : रोटरी क्लब मनमाड तर्फे मनमाड तसेच राज्यातिल विविध ठिकाणांहून आलेल्या गरजू अंध बांधवांना ब्रेल घड्याळे, स्पिकींग वॅाच, चष्मे व इतर साहित्य देण्यात आले. दरवर्षाप्रमाणे ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्ताने राज्यातील विविध ठीकाणांहून अंध बांधव मनमाड येथे एकत्र आले असता, समाजातील विविध संस्थांना तसेच देणगीदारांना अंधांच्या प्राथमिक गरजांकरीता केलेले आवाहन स्विकारत रोटरी क्लब मनमाड तर्फे सदर उपक्रम राबविन्यात आला. सदरील उपक्रमाचे आयोजन जयहिंद अंध कल्याणकारी संस्था, ठाणे यांच्यामार्फत करण्यात आले. मनमाड मधिल इतर संस्थांचेही सहकार्य लाभले.ह्याप्रसंगी रोटरी क्लब चे अध्यक्ष रोटे. इंजी.स्वप्निल सूर्यवंशी, सेक्रेटेरी रोटे.डॉ. सुमित शर्मा, रोटे.सुभाष गुज़राथी सर, रोटे.अनिल काकडे, रोटे. आनंद काकडे, रोटे. पोपटसेठ बेदमुथा, रोटे. राजू गुप्ता तसेच जयहिंद अंध कल्याणकारी संस्थेचे अधिकारी, विविध संस्थेचे पदाधिकारी आदि. उपस्थित होते.
