
नाशिक : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी नासिक प्रकल्प -2 राष्ट्रीय पोषण माह 1 ते 30 सप्टेंबर 2022 अंतर्गत अंकुर सुजाण पालकत्व मेळावा आयोजित करण्यात आला. बालक शिक्षण( पोषणा बरोबर शिक्षण देखिल) पालकांनी मुलांना कसा वेळ द्यावा, घरातील वस्तू चा वापरून करून कसे शिक्षण द्यावे , अवतीभोवती असलेल्या परीसर अशी विविध प्रकारची माहिती मुलांना द्यावी. पालकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुख्यसेविका सुज्ञा खरे मॅडम ह्यांनी महिलांना सुजाण पालक कसे असावे ह्या बद्दल योग्य मार्गदर्शन केले. अंगणवाडी सेविका गिरीषा खोडके यांनी विविध प्रकारचे खेळाचे प्रात्यक्षिक दाखवून त्या पासुन मुलांचे कोणकोणते विकास घडवता त्या बदल योग्य माहिती दिली .ह्या कार्यक्रमासाठी अं. क्र. 9 ,10, 11, 12 ,13 सेविकांचे व मदतनीस ताई ह्याचे सहकार्य लाभले.
