सर्जाराजा चा वाढदिवस उत्साहात साजरा

0

येवला  : येवला तालुक्यातील धूळगाव.येथे बैल पोळा उत्साहात साजरा भारताची कृषिप्रधान देश म्हणून ओळख असून बळीराजा पोळा हा सण मोठ्या थाटामाटात व उत्साहात साजरा करीत असतो ग्रामीण भागात शेतकरी बांधवांचा साथी म्हणजे सर्जाराजा या सर्ज्याराज्याचा वाढदिवस म्हणजे बैलपोळा,शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने शेतातील काळया मातीतल्या आईच्या कुसातुन हिरव सोन पिकवण्यासाठी हा सर्ज्याराज्या आपल्या खांद्यावर नांगराच ओझ न थकता ,उन वारा पावसाला न घाबरता शेतकरी शेत मशागत करताना शेतकऱ्याला मदत करत असतो म्हणून शेतकरीही त्या सर्ज्या राजावर जीवापाड प्रेम करतो म्हणून पोळा या उत्सानिमित्त सर्ज्याराजाला अंघोळ घालून त्यांना नवीन दोर, शिंगांना रंगीबिरंगी रंग लावून, गोंडे, फुगे तसेच अंगावर विविध कलाकृती चित्र काढून स्पर्धा रंगल्या सारखे सजावट करत इतरांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न शेतकरी पोळा उत्सनिमित्त करीत असतो तसेच गळ्यामध्ये घुंगराची माळ पायात हार गजरा अशी विविध सजावट करून सर्ज्याराजा एकत्र जमा करून गावातून मिरवणूक काढून विधिवत पूजा नैवद्य देऊन आशीर्वाद मिळविण्याचा. आनंद या पोळा सणानिमित्त व्यक्त केला जातो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here