
मनमाड : संतसेना फाऊंडेशन नाशिकरोड यांच्या वतीने संतसेना पुण्यतिथी निमित्ताने 2022 चा संतसेना समाज गौरव पुरस्कार दिनांक 25 ऑगस्ट 2022 रोजी माजी समाज कल्याण मंत्री मा. बबनराव घोलप यांच्या हस्ते नाशिकरोड येथे आयोजित संतसेना पुण्यतिथी कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. शाल स्मृतिचिन्ह चाफ्याची फुले देऊन सन्मानित करण्यात आले . यावेळी गीताताई गायकवाड यांनी पुरस्काराला उत्तर देतांना संतसेना फाऊंडेशन ने घेतलेल्या आपल्या समाज कार्याच्या नोंदी बाबत आभार व्यक्त केले तसेच महिला व बालके या दोन्हीं घटकां सोबत संवेदनशील पणे काम करण्याची गरज असल्याचे सांगितले.यावेळी आयोजक श्री संजय गायकवाड मा निवृत्ती आरींगळे शिवसेना नेते दत्ता गायकवाड व मोठया प्रमाणावर समाज बंधू बघिणी उपस्थित होते,
