
अहमदनगर (सुनिल नजन/अहमदनगर जिल्हा) पाथर्डी तालुक्यातील आडगाव येथील शेंडे वस्तीवरील बुवाजीबाबा मंदिरात श्रावणी यात्रा महोत्सव साजरा करण्यात आला. पारंपरिक पद्धतीने धनगरी न्रुत्य,ओव्या,होईक,आणि अन्नदान इत्यादी उपक्रमांनी या सोहळ्याची सांगता झाली. बुवाजी अहिलाजी पुणेकर यांच्या होईकातील भविष्य वाणीने अनेकांच्या भुवया उंचावल्या. पूणेकर यांनी सांगितले की मी पणा सोडा,निटनेटके पणाणे मान देउन देवाला मोठेपणा द्या,देव सांभाळला तर दोन्ही खीषे पैशाने भरतील.देव सोडला तर काटेरी रस्त्याने जावे लागेल. सगळे सोपे आहे पण एकमेकांना मोठेपणा द्या, हेवेदावे सोडून द्या आणि देवासमोर येताना नम्रता अंगी बाळगूनदेवाच्या चरणी लीन व्हावे असे पुणेकर सांगितले.या बुवाजीबाबा यात्रा महोत्सवासाठी शेंडे वस्तीवरील तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष सुखदेव शेंडे, आदिनाथ शेंडे,लक्ष्मण शेंडे,बहिरनाथ शेंडे, जनार्दन शेंडे,शिवाजी शेंडे,देवराव शेंडे, म्हातारदेव शेंडे, दत्तात्रय शेंडे,जगन्नाथ शेंडे,बाबासाहेब शेंडे, भाउराव शेंडे, भिमाजी शेंडे,साईनाथ शेंडे,सचिन शेंडे,विनायक शेंडे,दशरथ शेंडे,जालिंदर शेंडे, विलास शेंडे,बाबुराव शेंडे,धोंडीराम शेंडे,अमोल शेंडे,हरी शेंडे,सोपान शेंडे,ठकाजी शेंडे यांनी विषेश परिश्रम घेतले. महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली.पंचक्रोशीतील अनेक भाविक भक्त या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(प्रतिनिधी/सुनिल नजन,अहमदनगर जिल्हा)
