मनमाड : ( प्रतिनिधी -निलेश व्यवहारे ) भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मनमाड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे दोनदिवसीय मोफत आधार कार्ड व मतदान कार्ड लिंकिंग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि.20 व रविवार दि.21 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत डी.एम.ऑनलाइन सर्विसेस, सानप कॉम्प्लेक्स, नामको बँक खाली, मनमाड येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन मनमाड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
शनिवार दि.२० रोजी शिबिराचा प्रारंभ करण्यात आला, यावेळी कार्याध्यक्ष नाना शिंदे, हबीब शेख, अक्षय देशमुख, कोमल निकाळे, जावेद शेख, पवन आहिरे, आनंद बोथरा, प्रतिक मोरे, सुरेश वाघ, डि.एम.सव्हिसेस चे दिपक मकवाने आदि उपस्थित होते. शिबिरात १३७ नागरिकांनी सहभाग नोंदवला.
Home Breaking News भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मनमाड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे दोनदिवसीय मोफत आधार...