
(पत्रकार प्रशांत गिरासे वासोळ) लोहोणेर-येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयाचे उपशिक्षक सुनिल एखंडे यांना माध्यमिक व उच्च माध्यमिक शालेय समितीच्या वतीने उपक्रमशील शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.समाज दिनाचे औचित्य साधून सदर पुरस्काराचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी विविध शालेय उपक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण केल्या बद्दल तसेच उपक्रमांचे विविध माध्यमातुन प्रसिद्धी दिल्याबद्दल सदर पुरस्कार देण्यात आला. यावेळीसरपंच रतीलाल परदेशी, माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष अनिल आहेर, उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष भैय्यासाहेब देशमुख,दिगंबर कोठावदे, फुला जाधव, रमेश आहिरे, अशोक गुळेचा,डॉ.रविंद्र शेवाळे, रुपाली धामणे,अजित सोनवणे, जितू पाटील आदींसह मुख्याध्यापक वाय.यु.बैरागी व पर्यवेक्षक बी.के.व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सदर पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
