नक्षलवादी चकमकीत देशसेवे साठी शहीद झालेल्या स्व.सचिन साळवेंना अश्रूपुर्ण नयनांनी अखेरचा निरोप देण्यासाठी जनसमुदाय उसळला

0

अहमदनगर : (सुनिल नजन /अहमदनगर जिल्हा) देशाच्या संरक्षणासाठी आसाम मध्ये कार्यरत असलेले शहिद मेजर सचिन रामकिसन साळवे (वय३३) यांचा नक्षलवादी चकमकीत गोळी लागून म्रुत्यु होउन त्यांना वीरगती प्राप्त झाली. आणि ते देशासाठी शहिद झाले. शहीद स्व.सचिन साळवे हे अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील राक्षी या गावचे रहिवासी होते. ते आसाम मध्ये गोवाहाटी येथे देशसेवे साठी कार्यरत होते.सन २०११ साली ते भारतीय लष्करात भरती झाले होते. त्यांच्या मागे पत्नी, लहान पाच वर्षाची मुलगी,आई,वडील, दोन भाउ असा परीवार आहे. त्यांचा दुसरा ही भाउ राहुल साळवे हा भारतीय लष्करात जम्मू काश्मीर येथील नवसारा येथे देशसेवेत कार्यरत आहे.शहिद मेजर सचिन साळवे यांचा पार्थिवावर त्यांच्या राहत्या गावी राक्षी ता.शेवगाव येथे शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्यात आले.काही वेळ शेवगाव येथेही आंबेडकर चौकात पार्थिव देह नागरिकांना दर्शनासाठी ठेवण्यात आला होता.त्यांचा पार्थिव देहाची फुलांनी सजवलेल्या स्वर्ग रथातून संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली होती.अहमदनगर जिल्ह्यातील सर्व खात्याचे अधिकारी, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी हवेत रायफली उंचाउन अखेरची मानवंदना दिली. शहिद सचिन साळवे यांच्या पार्थिवावर अश्रुपुर्ण नयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. शहिद सचिन साळवे हे देशासाठी शहिद झाले ही बातमी कळताच सचिनच्या आईच्या आईने म्हणजे आजीने ही प्राणत्याग केला ही अतिशय दुखद घटना या वेळी घडली. सारा जनसमुदाय शहिद “सचिन साळवे अमर रहे “च्या घोषणा देत आक्रोश करीत होता.सर्वच राजकीय पक्षाचे नेते,कार्यकर्ते, अधिकारी, पदाधिकारी अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होते.(प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here