हेरिटेज वॉक अंतर्गत किल्ले चांदवड येथे ध्वजारोहण

0

चांदवड (प्रतिनिधी) गोरक्षनाथ लाड
चांदवड दुर्गभ्रमंती मंडळ व दुर्गप्रेमी नागरिकांचे वतीने किल्ले चांदवड येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत,ध्वजारोहण,वृक्षारोपन,पर्यावरण संवर्धन शपथ घेणे व श्रमदान कार्यक्रम आदीसह नागरिकांच्या वतीने करण्यात आले.
यावेळी माजी सैनिक आनंदराव देवरे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी वेदांगी सुर्यवंशी,हर्षाली सुर्यवंशी,अंजली सुताने,रूद्र डाके, विश्वराज सोनवणे यांनी राष्ट्रगीत गायले व सायंकाळी समारोप प्रसंगी वंदेमातरम गायले.शिक्षक प्रफुल्ल सोनवणे यांनी किल्ल्यांविषयी , ऐतिहासिक वास्तूं विषयी,पर्यावरण संवर्धन शपथ दिली. प्रा. डॉ. जी. डी. शिंदे सर यांचे मार्गदर्शनात किल्ल्यावर वाढलेले गवत व स्वच्छता करण्यात आली. यानंतर दुर्गभ्रमंती करत गड-किल्ल्यांचे स्वातंत्र्य समरातील योगदान याविषयी ग्रंथपाल संतोष ठाकरे सर यांनी व्याख्यान दिले.सायंकाळी वंदेमातरने सन्मानाने ध्वज उतरविण्यात आला व कार्यक्रमाचे समारोप करण्यात आले.याप्रसंगी प्रशांत सुताने , प्रकाश सुर्यवंशी , उदय वायकोळे , जितेंद्र डाके , संजय पाडवी , संतोष सोनवणे ,कृष्णा शिंदे , समीर सुताने , साई सुर्यवंशी , आदी दुर्गप्रेमी नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here