लोहोणेर जनता विद्यालयात शिक्षणाची ज्ञान गंगा घरोघरी पोहोचवुन समाजाच्या उत्कर्षाचा ध्यास घेतलेल्या कर्मविरांनी स्थापन केलेल्या मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचा समाज दिन साजरा

0

वासोळ ( पत्रकार प्रशांत गिरासे वासोळ )

लोहोणेर -: येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालय,अभिनव बालविकास मंदिर आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात मविप्र समाज संस्थेचा समाज दिन साजरा करण्यात आला. नाशिक जिल्ह्यात शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोहचवुन वंचित घटकांना प्रवाहात आणणाऱ्या आणि ‘ *बहुजन हिताय,बहुजन सुखाय* ‘ हे ब्रीद अंगिकारनारे संस्थेचे आद्य संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात यांचा जन्म दिवस १९ ऑगस्ट हा दर वर्षी समाज दिन म्हणून संस्थेच्या सर्व शाखांमधुन साजरा केला जातो.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच रतीलाल परदेशी, माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष अनिल आहेर,उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष भैयासाहेब देशमुख,शालेय समिती सदस्य,दिगंबर कोठावदे,फुला जाधव,अशोक गुळेचा, रमेश आहिरे, शिक्षक-पालक संघाचे उपाध्यक्ष डॉ.रविंद्र शेवाळे,रुपाली धामणे,जितू पाटील,अजित सोनवणे आदींसह मुख्याध्यापक वाय.यु.बैरागी व पर्यवेक्षक बी.के. जाधव आदी व्यासपिठावर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक वाय.यु. बैरागी यांच्या हस्ते संस्थेच्या ध्वजाचे ध्वजपूजन व ध्वजारोहण करून करण्यात आली. यावेळी गीत मंचाने समाजगीताचे गायन केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते कर्मवीरांच्या प्रतिमेला पुष्पहार व पूजन करून अभिवादन करण्यात आले. १९१४ साली लावलेल्या या छोट्याश्या रोपट्याचे मोठ्या वटवृक्षात रूपांतर करण्यासाठी कर्मवीरांनी केलेल्या कार्याची महती राकेश थोरात यांनी आपल्या प्रस्ताविकातून सांगितली. विद्यालयाच्या विद्यार्थिनी विद्या निकम,श्रेया सोनवणे,नेहा बच्छाव व सिद्धी सूर्यवंशी आदींनी आपल्या विचारातून संस्थेचा व कर्मवीरांनी केलेल्या कार्याचा इतिहास मांडला. यावेळी इयत्ता दहावी,बारावी व इतर स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. विद्यालयात विविध उपक्रमांच्या यशस्वी आयोजनाबद्दल सांस्कृतिक समिती प्रमुख सुनिल एखंडे यांना शालेय समितीच्या वतीने उपक्रमशील शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.यावेळी अशोक गुळेचा यांनी आपले मनोगत व्यक्त व्यक्त करत कर्मवीरांनी केलेल्या कार्याचा आदर्श सर्वांनी घ्यावा असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक समितीच्या वतीने करण्यात आले.कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाला विद्यार्थी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राकेश थोरात व सुनिल एखंडे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here