
अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर) नवसाला पावणारा महादेव म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील श्री क्षेत्र घोटन येथील पांडव कालीन मल्लिकार्जुनाची यात्रा श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी भरते. घोटण गावातील वनीनाथ भानुदास जगधने हा मुलगा बारा वर्षाचा असताना सहावीच्या वर्गात शिकत होता. शाळेत जात नाही म्हणून वडिलांनी मारले म्हणून तो रागाने गावातून निघून गेला.त्याचा सर्व नातेवाईका कडे शोध घेतला पण तो सापडेना म्हणून त्याची आई संगिता भानुदास जगधने यांनी या मल्लिकार्जुनेश्वराला नवस केला होता की माझा मुलगा सापडू दे,माझ्या घरापासून तुझ्या चरणावर लोटांगण घालीत पेढ्याने भरलेल्या दुरड्या वाजत गाजत अर्पण करीन असा नवस तेव्हा बोलली होती, तो मुलगा चक्क बारा वर्षानंतर पुन्हा घरी आला. आता त्याचे वय चोवीस वर्षे आहे. घरी आल्यावर यात्रेत नवसपुर्ती करण्यासाठी मंदिरापासून एक किलोमीटरवर असलेल्या घरापासून नवसपुर्ती साठी भर पावसात लोटांगण घालीत नवस पुर्ण केला. नवसाला पावतो अशी या महा देवाची सर्वत्र ख्याती आहे. अनेक भगिनी नवसापुर्ती आपली बालके घेऊन येथे उपस्थित होत्या.यात्रे निमित्त भाविकांनी अतिशय गर्दी केली होती.गावातील यात्रा कमेटीच्या वतीने महाराष्ट्रातील नामवंत मल्लांच्या कुस्त्यांचा जंगी हंगामा भरवन्यात आला होता. जिल्हा परिषद सदस्य नितीन काकडे,पंचायत समितीचे माजी सभापती क्षितिज घुले यांनी ही या मंदिरास भेट देऊन दर्शन घेतले. आणि आखाड्यातील पैलवानांना कुस्त्यांसाठी प्रोत्साहन दिले. मंदिराचे पुजारी रवींद्र शिंदे यांनी भाविकांना दर्शन घेण्यासाठी अतिशय सुंदर व्यवस्था केली होती.हे महाभारतातील पांडव कालीन मंदिर सध्या पुरातत्व खात्याने ताब्यात घेतले आहे.
(प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर जिल्हा)
