
नाशिक : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री माननीय नामदार रामदासजी आठवले यांचा नाशिक दौरा मोठ्या उत्साहात संपन्न.16 ऑगस्ट 2022 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवले यांचा नाशिक दौऱ्याप्रसंगी शासकीय विश्रामगृह नाशिक येथे नाशिक जिल्हा अध्यक्ष मा.प्रकाशजी लोंढे साहेब मार्गदर्शनाखाली व उत्तर महाराष्ट्र युवक अध्यक्ष मा. वंदेशजी गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली ब्राह्मण आघाडी मनमाड शहराचे मंदार कुलकर्णी यांचा प्रवेश संपन्न झाला.
याप्रसंगीयुवा नेते गोरख चौधरी,नाशिक जिल्हा वाहतूक आघाडीचे दीपकजी आहिरे, व्यापारी आघाडीचे अनिल गु़ंदेचा,दिलीप बरडिया,दीपक साळवे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
