
दरेगाव (प्रतिनिधी) गोरक्षनाथ लाड -आपण ज्या शाळेत शिकतो, लहानसे मोठे होतो अज्ञानातून ज्ञानाकडे वाटचाल करतो, यशाची कीर्ती प्राप्त करतात अशा शाळेविषयी प्रत्येकाला जिव्हाळा असतो मात्र या शाळेचे ऋण आपण फेडावे, कामानिमित्त दुरावलेले मित्र मैत्रीण पुन्हा या माध्यमातून एकत्र यावेत, यासाठी चांदवड तालुक्यातील निमोण येथील जनता विद्यालयातील 1998 ला दहावीत शिक्षण घेणाऱ्या तत्कालीन बॅचचे माजी विद्यार्थी यांनी एकत्र येऊन तब्बल 24 वर्षांनी स्नेह मेळावा काही दिवसापूर्वी भरवला होता.तो मेळावा नव्हे तर वर्गच भरला होता असे वातावरण होते सर्वांनी एकमेकांच्या सुखदुःखाच्या गप्पा मारत आपण या ज्ञानमंदिरात शिकलो त्या मंदिराप्रती केवळ शब्दातून सद्भावना व्यक्त न करता आपण शाळेचे काहीतरी देणे लागतो या उदात्त भावनेने सर्वांनी एकत्र येत माजी विद्यार्थ्यांनी यथाशक्ती काही रक्कम जमा करून सदर रकमेची शाळेच्या नावाने एफडी करून त्या एफ डी च्या येणाऱ्या व्याजातून दरवर्षी दहावी उत्तीर्ण होणाऱ्या गुणवंतांस बक्षीस देण्याचे ठरले व बघता बघता सर्वांनी ही संकल्पना तडीस न्यायची ठरवली व तसा निधी गोळा केला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमित्त विद्यालयात झालेल्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाप्रसंगी या माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित रहात सदर निधी शाळेकडे दिला.त्यांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.आपण सर्वांनी मिळून एका चांगल्या कामासाठी निधी संकलनाचा संकल्प केला ती तारीख 15 मे 2022 आणि बघता बघता या चांगल्या कार्यासाठी निधी देणाऱ्यांचे हात वाढत गेले.यासाठी अनेकांनी सर्वतोपरी मदत केली.आणि एवढा निधी( माजी )विद्यार्थी शाळेसाठी देऊ शकता का ?अशी शंका उपस्थित करणाऱ्यांना कामातून उत्तर दिले.या मध्ये वैचारिक मतभेद असू शकतात पण मन भेद मात्र कधीही होऊ दिला नाही.निखळ मैत्री आपल्या हातून किती चांगलं काम करून घेऊ शकते याचा एक आदर्श पुढच्या पिढीसाठी हा ग्रुप ठेवत आहोत . या ग्रुपला “स्पंदन “हे साजेसे नावही देण्यात आले आहे .
“स्पंदन “ग्रुप 1998 च्या वतीने हा निधी देण्यात आला यावेळी सरचिटणीस मॅडम मविप्र नासिक नीलिमा ताई पवार,डाॅ भाऊराव देवरे बाळासाहेब पिंपळे,देवनाथ पवार,राजेंद्र लाड,विलास देवरे,देविदास जेजुरे,रमेश सोमासे,भगवान गोसावी, प्रवीण आहेर,तसेच स्कूल कमिटी अध्यक्ष रतन दखणे, वाल्मिक देवरे,कांतीलालजी निकम,भिकाजी भवर यांनी चेक स्वरूपात माननीय सरचिटणीस मॅडम मविप्र नासिक नीलिमा ताई पवार यांच्याकडे सुपूर्त केला त्यांनी मनापासून सगळ्यांचे अभिनंदन केले. [आम्ही 2020 मध्ये माजी विद्यार्थ्यांचा एक व्हाट्सअप ग्रुप तयार केला होता सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारांची देवाण-घेवाण चालू असतानाच माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेण्याचे ठरले. सदर मेळाव्यास नाशिक, कल्याण, पुणे ,चांदवड मनमाड व परिसरातून माजी विद्यार्थी दाखल झाले होते सर्वांनी एकत्र येत हा निर्णय घेतला सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवून निधी जमा करण्याची जबाबदारी दिली त्याप्रमाणे तो जमाही केला.सदर निधीचा हिशोब प्रत्येक वर्ग मित्राला देण्यात आला व त्यानंतर हा निधी आम्ही शाळेकडे दिला भविष्यात अजूनही आम्हाला विविध कामे करण्याची इच्छा आहे.
डॉ. भाऊराव देवरे – माजी विद्यार्थी ]
