श्रद्धा हॉस्पिटल व युवा सत्ता मंच तर्फे पोलिसबांधवांकरता स्तुत्य उपक्रम

0

मनमाड :  हॉस्पिटल व युवा सत्त्ता मंच यांच्या सौजन्याने पोलिस बांधव व भगिनी यांच्या साठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.स्वातंत्र्याचा 75 अमृत महोत्सवाचे औचित्य साधुन श्रद्धा हॉस्पिटल मध्ये शिबिर पार पडले. प्रमुख पाहुणे प्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी Dysp समीरसिंह साळवे साहेब व सौ साळवे यांच्या हस्ते फित कापून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमास पो नि प्रल्हाद गिते साहेब आतिथी म्हणून उपस्थित होते. डॉ. गौरव पाटील यांनी प्रास्ताविकात शिबीराचे उदिष्ट सांगीतले, डॉ. गौरव पाटील यांच्या हस्ते साळवे साहेबांचा तर युवा सत्ता मंच चे शुभम गायकवाड यांनी डॉ गौरव पाटील यांचा सत्कार करण्यात आला.पो. नि. प्रल्हाद गितें साहेबांचा डॉ भूषण पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यान आला.
पोलिस उपविभागीय अधिकारी साळवे साहेबांनी डॉ पाटील परिवाराला शुभेच्छा दिल्या व शिबिर आभार मानले.40 पुरुष पोलिस 15 महिला पोलिसांनी शिबिरात 55 पोलिसांनी सहभाग नोंदवला व् पुरुष पोलिस चेकअप डॉ गौरव पाटिल डॉ भूषण पाटील यांनी केले व महिला पोलिसांचे चेकअप डॉ सोनाली गौरव पाटील यांनी केले. तपासणी / ब्लड प्रेशर, रूटीन चेक अप व सोनोग्राफी (CBC Blood Sugar Kidney Function Test ,Liver function test,Spo2,BMI सारख्या तपासण्या करण्यात आल्या औषधे मोफत वाटप करण्यात आले. कार्यक्रमास श्रद्धा हॉस्पिटलचे संचालक डॉ. विजय पाटील, डॉ. आशा पाटील डॉ. सोनाली पाटील,तसेच प्रशांत उपासनी सर यांनी सूत्रसंचालन केले व हॉस्पिटल स्टाफ व युवा सत्ता मंच चे पदाधिकारी उपस्थित होते.
या शिबिराबद्दल डॉ पाटिल परिवाराचे व श्रद्धा हॉस्पिटल चे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here