
वासोळ( पत्रकार प्रशांत गिरासे वासोळ,मो 9130040024 ) दिनांक १३ ऑगस्ट २०२२ ते दिनांक १५ ऑगस्ट २०२२ यादरम्यान स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी पर्वावर घर घर तिरंगा,हर घर तिरंगा या अभियानात वासोळपाडा (फुलेनगर) ता.देवळा या गावातील ग्रामपंचायतीचे सरपंच,उपसरपंच,सदस्य,पोलीस-पाटील,शिक्षक,विद्यार्थी, ग्रामसेवक, ग्राम पंचायत कर्मचारी,बचत गटाचे अध्यक्ष व सदस्य,स्वस्त धान्य दुकानदार,गावातील सर्व लहान-थोर मंडळी यांनी सर्वांनी आनंदाने सहभाग घेऊन अतिशय आनंदी आणि उत्साही वातावरणात घर घर तिरंगा,हर घर तिरंगा अभियानांतर्गत गावात प्रभातफेरी काढून नंतर रांगोळी स्पर्धा,निबंध स्पर्धा,वकृत्त्व स्पर्धा,वेशभूषा अशा सर्व स्पर्धात सहभाग घेतला.सौ.सरलाबाई मन्साराम बच्छाव(उप- सरपंच),कुमारी.हर्षाली बाजीराव बागुल(उच्च शिक्षित तरुणी),श्री.विकी रमेश बच्छाव(सैन्यदलातील जवान),श्री.सागर नानाजी खैरनार(सैन्यदलातील जवान) यांच्या हस्ते ध्वजारोहण करून अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.घर घर तिरंगा, हर घर तिरंगा या अभियानात गावातील सर्व तरुण,तरुणी,जेष्ठ नागरिक,महिला,शिक्षक व विद्यार्थी या सर्वांनी सहभाग घेतला.आणि अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.
