
नाशिक : 🇾🇪स्वातंत्र्यदिन समारोह🇾🇪
मा. बाळासाहेब ठाकरे विद्याप्रबोधिनी मनपा शाळा क्र.71 मध्ये अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन समारोह कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मा. नगरसेवक तथा शिवसेना महानगरप्रमुख मा. सुधाकरभाऊ बडगुजर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी परीसरातील प्रतिष्ठित नागरीक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सविता साळुंके, उपाध्यक्ष दत्तात्रय कांबळे, सदस्य प्रणिता कोल्लूर, सागर देसाई, जगन्नाथ कुर्हे, मनपा हायस्कूलचे मुख्याध्यापक सूर्यकांत शिरोडे, दत्तात्रय बुनगे इ. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रथम ढोल ताशांच्या गजरात शालेय परीसरातून विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली. प्रभातफेरीत विद्यार्थ्यांच्या हातातील राष्ट्रीय प्रतिके, विविध घोषफलक तसेच राष्ट्रपिता म. गांधी, पंडित नेहरु, नेताजी सुभाषचंद्र बोस, झाशीची राणी इ. वेभूषेतील बालके नागरीकांचे लक्ष वेधून घेत होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब सातपुते यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त शाळेने राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती देत एक सुज्ञ भारतीय नागरिक म्हणून देशाची एकता व अखंडता अबाधित राखण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचे प्रतिपादन केले. तर अध्यक्षीय मनोगतात मा. नगरसेवक मा. सुधाकरभाऊ बडगुजर यांनी स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना शुभेच्छा देत शाळा घेत असलेल्या विविधांगी उपक्रमांतून शाळेची दिवसेंदिवस प्रगती होत असल्याचे गौरवोद्गार काढले.
यावेळी नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत, पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान ‘ यशस्वी होण्यासाठी मातापालक गटांचे कार्य सांगत मातापालक गटांना व्यासपीठावर स्थान देऊन त्यांची ओळख मुख्याध्यापक बाळासाहेब सातपुते यांनी उपस्थितांना करुन दिली.
तद्नंतर परीत्राण कांबळे, देवयाणी पाटिल, चंचल ठाकूर या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यदिनाशी संबंधित भाषणे केली. सिद्धीका देसाई हिने ‘ए मेरे वतन के लोगो ‘, लावण्या गायकवाड हिने ‘तेरी मिट्टी में मिल जावा ‘ हि वैयक्तीक गीते, हा देश माझा हे समूहगीत सुंदर प्रकारे सादर केले. तसेच ए देश है वीर जवानोंका, देश रंगीला रंगीला, तेरी मिट्टी में मिल जावा, सुनो गौर से दिलवालो इ. देशभक्तीपर गीतांवर विद्यार्थ्यांनी समूहनृत्ये तर इ. ८ वी च्या विद्यार्थ्यांनी ‘ चक दे इंडिया ‘ या गाण्यावर मानवी मनोरे सादर करत उपस्थितांची मने जिंकली.स्वातंत्र्यदिन कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रुपाली ठोक व विनोद मेणे यांनी तर आभार किसन काळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक बाळासाहेब सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली विनोद मेणे, किसन काळे, प्रमिला देवरे, शोभा मगर, कविता वडघुले, रुपाली ठोक, वर्षा सुंठवाल, सुवर्णा थोरात, किर्तीमाला भोळे, शैलजा भागवत, योगिता खैरे, सुनिता धांडे, प्रविण गायकवाड, गणेश काजळे यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमास अंगणवाडी सेविका, मदतनीस, विद्यार्थ्यांचे पालक बहुसंख्येने उपस्थित होते.🇾🇪🇾🇪🇾🇪🇾🇪🇾🇪🇾🇪🇾🇪🇾🇪🇾🇪🇾🇪
