रेल्वे प्रवासी संघाची बदलापूरत प्रथम सभा

0

बदलापूर (गुरुनाथ तिरपणकर)-शहरातील रेल्वे प्रवाशांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी रेल्वे प्रवासी संघाच्यावतीने रविवारी दिनांक ७/८/२०२२रोजी संध्याकाळी ५वाजता ध्रुव अकॅडमी,नवरत्न हाॅटेलच्या मागे,कार्तिक काॅम्प्लेक्स,बदलापूर(पूर्व)येथे प्रथम सभा आयोजित करण्यात आली आहे. सभेमध्ये नविन कार्यकारिणी,संघटनेची उध्दीष्टे,रेल्वे प्रवासी फे-या वाढविणे,सुरक्षा,स्वच्छता गृह,होम प्लॅटफॉर्मचे काम युध्द पातळीवर होणेबाबत,रेल्वेच्या विविध समस्यांबाबत पत्रव्यवहार करणे,रेल्वे प्रवासी संघ व रेल्वे प्रशासन यामध्ये समन्वय राखणे व पुढील वाटचाल यावर सविस्तर चर्चा होईल.सभेस उपस्थित रेल्वे प्रवाशांनी आपल्या समस्या व उपाय यावर चर्चा करावयाची आहे.त्याकरिता रेल्वे प्रवासी संघाने आयोजित केलेल्या प्रथम सभेस बदलापूरकर रेल्वे प्रवाशांनी उपस्थित रहावे असे आवाहन रेल्वे प्रवासी संघाकडुन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here