स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साठी अंगणवाडी सेविकानीं केली जनजागृती

0

मनमाड – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निम्मित एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (नागरी) नाशिक-२प्रकल्प अधिकारी अजय फडोळ व मुख्यसेविका श्रीमती शितल गायकवाड, सुज्ञा खरे यांच्या मार्गदर्शना खाली मनमाड रेल्वे टिकिट घर व रेल्वे स्टेशन ह्या ठिकाणी 13 ते 15 ऑगस्ट ह्या दिवशी घरोघरी तिरंगा लावन्यासाठी नागरिका मध्ये जनजागृती करण्यात आली.या वेळी पथनाट्य करण्यात आले.संपूर्ण देशात जनजागृती होऊन प्रत्येकाने स्वइच्छेने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव मध्ये स्वताच्या घरावर तिरंगा लावून सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले. ह्या वेळी अंगणवाडी सेविका अन्नपूर्णा अडसुळे, वैशाली कातकडे, कल्पना जाधव,सीमा चौधरी, राजेश्री निरभवणे,परवीन,जयश्री देशमुख, प्रतिभा उगलमुगले ,निलेशा चव्हाण आदी अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या,जनजागृती साठी रेल्वे पोलिस कर्मचारी,TC, गार्ड यांनी सहभाग नोंदवला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here