ज्येष्ठ अभिनेते,समाजसेवक विलास (बाळा) चौकेकर यांचा सेवानिवृत्ती सन्मान सोहळा संपन्न..

0

मुंबई-दादर (प्रतिनिधी-महेश्वर तेटांबे)
ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉएज युनियनचे शाखा अध्यक्ष पूर्व विभाग आणि मुंबई जीपीओ पोस्टल सोसायटीचे माजी संचालक लालबाग परळ सांस्कृतिक मंचचे सदस्य माननीय कॉ विलास चौकेकर म्हणजेच सर्वांचे लाडके बाळासाहेब यांचा सेवानिवृत्ती सन्मान सोहळा नुकताच दादर पोस्ट ऑफिस मध्ये संपन्न झाला सदर प्रसंगी संपूर्ण मुंबईतील पदाधिकारी आणि अनेक सन्मानीय मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या अत्यंत शांत आणि संयमी नेतृत्व आज सेवानिवृत्त होत असलं तरी त्यांचे कार्य कधीही थांबणार नाही अशी वचन पूर्ती या निमित्ताने झाली. राष्ट्रीय कार्याध्यक्ष कॉ सुनील पालव सचिव कॉ चंद्रशेखर शिंदे कॉ विजय जाधव खजिनदार कॉ संदीप ठोंबरे कॉ संदेश भुजबळ आणि सोहळा समितीने हा सोहळा दिमाखात संपन्न केला. सदर प्रसंगी सत्कारमूर्ती म्हणाले की मी जरी सेवा निवृत्त होत असलो तरी शरीर आणि मनाने नाही माझे समाज कार्य सदैव सुरू राहील।आणि पोस्टल चे कार्य सुरळीत ठेवण्यास नक्की हातभार लावीन. अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून त्याना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या काही सदस्यांनी कविता तर काहींनी गाणी सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले. शेवटी प्रिती भोजनासाहित श्री व सौ चौकेकर यांनी उपस्थित्यांचे साश्रु नयनानि आभार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here