मुंबई पोलिसांची ई सिगरेट विक्रेत्यांवर कारवाई; 14 लाखांचा माल जप्त

0

मुंबई : जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई – विदेशी कंपन्यांकडून ई-सिगारेट ही परवाना नसलेली उत्पादने भारतात बेकायदेशीरपणे आयात करून त्यांची मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. लोकांना धुम्रपान सोडण्यास मदत करतील या नावाखाली ही उत्पादने विकली जातात. परिणामी तरुणांमध्ये ई-सिगारेट वापरण्याचा कल झपाट्याने वाढत आहे. परंतु त्याच्या वापरामुळे प्रत्यक्षात फायद्या पेक्षा तोटाच जास्त आहे.मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या सी. बी. कंट्रोल कक्षाकडून मुंबई मधील ई-सिगारेट उत्पादनांची विक्री करणाऱ्या दुकानदारावे कारवाई केली. मुंबईमधील विविध ठिकाणी ई सिगारेटचा साठा व विक्री केली जात असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली होती. प्राप्त माहितीची शहानिशा करून पुढील तपासासाठी पोलीसांची 12 वेगवेगळी पथके तयार करण्यात आली.मुंबईत पथकांनी पाली नाका, खार, लोखंडवाला अंधेरी, मालाड येथे 11 दुकाने व ऑनलाईन पद्धतीने विक्री करणारे असे 12 ठिकाणांवर छापा कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या कारवाई दरम्यान दुकानांमध्ये इलेक्ट्रॉनिक सिगारेट, रिफीलिंग विविध मॉडल्स व हुक्क्या करीता वापरण्यात येणारी सुगंधीत तंबाखू 2030 इलेक्ट्रॉनिक सिगारेट, हुक्का फ्लेव्हर चे 963 बॉक्स मधील, ई-सिगारेट करीता वापरण्यात येणारे रिफीलींग द्रावणाचे 53 बॉटल्स असा 14 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला व 11 इसमांना अटक केली. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवला असून या संदर्भात पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here