जवखेडे येथे एकात्मिक कापुस उत्पादन वाढ व मुल्यसाखळी विकास संदर्भात शेतकरी प्रशिक्षण संपन्न

0

अहमदनगर ( सुनिल नजन/अहमदनगर ) महाराष्ट्र शासनाच्या क्रुषि विभागा अंतर्गत २५ जुन ते१जुलै २०२२ या काळात क्रुषि संजिवनी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.याचे औचित्य साधून अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जवखेडे येथे एकात्मिक कापूस उत्पादन वाढ व मु्ल्यसाखळी विकास शेतकरी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.हा कार्यक्रम राजकीय नसुन तो सर्व शेतकऱ्यासाठी होता.आणि फक्त शेतकरी प्रशिक्षणाचा उद्देश होता. पुण्याच्या क्रुषि आयुक्तालयातील उपसंचालक पांडुरंग सिगेदार साहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.तसेच राहुरीच्या महात्मा फुले क्रुषि विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ दत्तात्रय पाचरणे्, अहमदनगर जिल्हा क्रुषि अधिकारी कापसे साहेब,पाथर्डी तालुका क्रुषि अधिकारी शिंदे साहेब, मंडल अधिकारी दराडे साहेब, क्रुषि सहाय्यक शेळके मँडम यांनी हा उपक्रम सर्व सामान्य शेतकऱ्यासाठी उपलब्ध करून दिला होता.या शेतकरी प्रशिक्षणात “मुल्य साखळी विकास “या संदर्भातील पांडुरंग सिगेदार साहेब यांनी “एक गाव एक वाण”या उपक्रमा अंतर्गत “श्रीकर सिड्स चे जयहो (बैलजोडी)या कपाशीच्या वाणाचे शंभर शेतकऱ्यांनी हे बियाणे घेउन गट व्यवस्थापन व विक्री या विषयी प्रबोधन केले.डॉ.दत्तात्रय पाचरणे यांनी,सुधारित तुर,उस, लागवड या विषयी माहिती दिली.या वेळी प्रगतशील शेतकरी पोपट सरगड,व चंद्रकांत नेहुल यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी कानिफनाथ क्रुषि सेवा केंद्राचे संचालक आणि जवखेडे दुमालाचे उपसरपंच भास्कर शेठ नेहुल, साईक्रुषी सेवा केंद्राचे संचालक संतोष मतकर, चारुदत्त वाघ,सुरेश वाघ,वैभव आंधळे इरफान पठाण, वसंतराव नेहुल, मुस्ताकभाई शेख,शरद गवळी, रुस्तुम शेख,कानिफनाथ कराळे,पिनू गवळी,व ईतर क्रुषि अधिकारी उपस्थित होते. नंतर गावातील जनाई इंडस्ट्रीज या सरकीपेंड तयार करणाऱ्या कंपनीला भेट देऊन नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा लागेल असे सांगितले. (प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here