अनुसुचित जातीतील बौद्ध घटकांना जातीचे दाखले मिळावे यासाठी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

0

देवळा : प्रशांत गिरासे वासोळ
अनुसुचित जातीतील बौद्ध घटकांना बौद्ध समाजाचे जातीचे दाखले मिळणेसाठी तांत्रिक दुरुस्ती करावी या मागणीचे निवेदन नाशिक जिल्हा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले सदर निवेदनात म्हटले आहे की, सविनय १९९२ च्या शासन निर्णयानुसार सगळे बौद्ध घटक हे बौद्ध आहेत भारतीय संविधानाच्या अनुसूचीनुसार बौद्ध धर्म मान्यता प्राप्त आहे.तत्राप आपल्या जिल्ह्यामध्ये बौद्ध घटकांतील लोकांनी सेतु कार्यालयाकडे जातीच्या दाखल्यासाठी अर्ज करतांना बौद्ध म्हणून दाखला मिळावा अशी विनंती केल्या नंतर सुध्दा संबंधित सॉफ्टवेअर मध्ये तशी व्यवस्थाच नाही.१९९२ च्या शासन निर्णयानुसार बौद्ध घटकांना बौद्ध म्हणून जातीचा दाखला मिळणेसाठी सेतूच्या सॉफ्टवेअर मध्ये तशी तांत्रिक दुरुस्ती करावी निवेदनावर भारतीय बौद्ध महासभेचे नाशिक जिल्हाध्यक्ष शरद केदारे,महासचिव तथा देवळा पंचायत समितीचे मा.सभापती राहुल केदारे,राहुल अहिरे,प्रशांत केदारे,धम्मसेवक केदारे,रामदास केदारे,आप्पा केदारे,मुकेश गरुड आदींच्या सह्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here