पेठ तालुक्यात पंचवीस कोटी आठ्ठावन्न लाख रक्कमेच्या नळ पाणीपुरवठा योजनांचा शुभारंभ

0

नाशिक : केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत पेठ तालुक्यातील २७ गावांच्या २५ कोटी ५८ लाख रकमेच्या योजनांचे भूमिपूजन केंद्रीय कुटुंब कल्याण व आरोग्य राज्यमंत्री डॉ भारतीताई पवार* यांचे हस्ते दि १७ जुन शुक्रवारी दुपारी 2 वाजता कोपुर्ली बु. येथे होणार. पेठ हा आदिवासी बहुल तालुका आहे. परंतु गावात नळ पाणी पुरवठा योजना नसल्याने व ज्या ठिकाणी ग्रामपंचायतीने तयार केलेल्या आहेत त्यातून प्रत्येक कुटुंबाला शुद्ध पाण्याचे पाणी पुरवठा होत नसल्याने केंद्रीय कुटुंब कल्याण व आरोग्य राज्यमंत्री डॉ भारतीताई पवार यांच्या प्रयत्नातून हर घर जल या जलजीवन मिशन* योजनेअंतर्गत २७ गावांचा समावेश करण्यात आला आहे. पेठ तालुक्यासाठी केंद्र शासनाने २५ कोटी ५८ लाखांचा निधी मंजूर केला या कामांचा आदेशही देण्यात आला आहे. या योजनेत काही ठिकाणी नवीन विहीर, पाण्याची टाकी, नवीन पाईपलाईन, पाईपलाईन दुरुस्ती नळ जोडणी आदी कामांचा समावेश आहे. या कामांचा भूमिपूजन सोहळा केंद्रीय कुटुंब कल्याण व आरोग्य राज्यमंत्री डॉ भारतीताई पवार यांचे हस्ते दि १७ जुन दुपारी 2 वाजता कोपुर्ली बु. येथे होणार आहे. तालुक्यातील गावांचा समावेश व योजनेसाठी मंजुर निधी एकदरे नळ पाणी पुरवठा योजना ७५४२३४६, हनुमंत पाडा ५६८५८७८, कोपूर्ली बू. १४९२९५४३, खोकरतळे १११४४११७२, हातरूंडी ७७८३२२४ रानबारी १२५०६१८९, म्हसगण ११७६०८१२, विरमाळ ५३४०७४९, पाहुचीबारी १०५४३५१० लिंगवणे ५५००३६८, पिंपळपाडा, मेंढपाळ ग्रा. पंचायत जोगमोडी ६८०८०१९, कुळवंडी ९९५३२२८, खिरकाडे पाडा ९२०८४०२, जुनोठी ८१४४३४९, चाफ्याचापाडा, शिदमाळ ७०९३६५६, गांगोडबारी, धाब्याचा पाडा ८९९८१९०, उबंरपाडा (क) ३८४३७२६ भायगाव १२१८३४४६, कुभांरबारी इनामबारी ग्रा. पंचायत कुभांरबारी ११४१७५३७, बाडगी ४०३३१७०, हरणगांव १२२४९४२७ नाचलोंढी १८४५३३१६, गोंदे १०११५५२२१, आसरबारी ९८३३७९४ वागंणी १५६१०८२५, पळशी ग्रा. पंचायत. गावंद ७१५८७५१, आमलोन ८३३९४६२७ आदी गावांना २५, ५८, ७५४७५ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here