आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती ताई पवार यांच्या हस्ते भूमिपूजन

0

पेठ : जलजीवन मिशन अंतर्गत पेठ तालुक्यात २५ कोटी ५८ लाख रुपयांच्या नळ पाणीपुरवठा योजना मंजुरी देण्यात आली असून तालुक्यातील २७ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यामुळे नजिकच्या आहे. काळात सुटणार आहे. *केंद्रीय कुटुंब कल्याण व आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारतीताई पवार* यांनी यासाठी पाठपुरावा करवून मंजुरी मिळविली.जलजीवन मिशन अंतर्गत तालुक्यातील २७ गावातील २५
कोटी ५८ लाख ७५ हजार ४७५ रूपये रकमेच्या योजनांचे भूमिपूजन *केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती ताई पवार यांच्या हस्ते शुक्रवारी ता. १७ *दुपारी २ वाजता कोपुलों बु. येथे होणार आहे.
पेठ हा आदिवासी बहुत तालुका आहे. अनेक गावात नळ पाणापुरवठा योजना नसल्याने व जिथे ग्रामपंचायतीने तयार केलेल्या आहेत, त्यातून प्रत्येक कुटुंबाला शुद्ध पाणिपुरवठा होत नसल्याची स्थिती आहे.हे जाणून केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारतीताई पवार* यांनी या प्रश्नाला प्राधान्य देत *हर घर जल” या जलजीवन मिशन* योजनेंतर्गत २७ गावांचा समावेश करण्यात आला आहे. पेठ तालुक्यासाठी केंद्र शासनाने २५ कोटी ५८ लाखांचा निधी मंजूर केला असून या कामांचे आदेशही देण्यात आले आहेत. या योजनेत काही ठिकाणी नवीन विहार, पाण्याची टाकी, नवीन पाईपलाईन, पाईपलाईन दुरुस्ती नळ जोडणी आदी कामांचा समावेश आहे.पेठ तालुक्यातील समाविष्ट गावे एकदरे, हनुमंतपाडा, कोपुलों बु., खोकरतळे, हातरुंडी, राजवारी, म्हसगण, विरमाळ, पाहुचीबारी, लिंगवणे, पिंपळपाडा, कुळवंडी, खिरकडे, जुनोठी, चाफ्याचापाडा, गांगोडवारी, उंबरपाडा (क), भायगाव, कुंभारबारी, इनामवारी, बाडगी, हरणगाव, नाचलोंढी, गोंदे, आसरबारी, वांगणी, पळशी, आमलोण.उर्वरित गावांतही योजना प्रस्तावित उदिष्ट असून उर्वरित गावांची पेठ तालुक्यातील 193 योजना प्रस्तावित आहे. ग्रामपंचायतीसह त्याअंतर्गत मंजुरीनंतर तात्काळ शुभारंभ येणाऱ्या वाडी वस्तीपर्यंत करण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा योजना राबवण्याचे सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here