जिजामाता कन्या विद्यालयात जागतिक पर्यावरण दिन साजरा

0

पत्रकार प्रशांत गिरासे वासोळ : दरवर्षी ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो.पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी यादिवशी वेगवेगळे पर्यावरण विषयक जागरूकता आणि कृती कार्यक्रम आयोजित केले जातात. जागतिक पर्यावरण दिवस या दिवशी त्या गोष्टी बद्दल जागरूक केले जाते. ज्यांचा जगावर आणि पर्यावरणावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होतात. हा दिवस पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करण्याच्या आपल्या जबाबदारीचे आपल्याला जाणीव आणि द्रष्टीकोन देतो.या दिवसाचे औचित्य साधून देवळा एज्युकेशन सोसायटी संचालित जिजामाता कन्या विद्यालय,देवळा व श्री.शिवाजी मराठा इंग्लिश स्कूल देवळा येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.यावेळी मुख्याध्यापिका सौ.प्रतिभा सागर मॅडम,मुख्याध्यापक श्री.डी.आर.आहेर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.तसेच सर्व कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थीनी यांच्या कडून पर्यावरण प्रतिज्ञा वधवून घेण्यात आली.पर्यवेक्षक व वृक्षमित्र समुपदेशक श्री.सुनील आहेर सर यांनी या दिवसाचे महत्त्व विशद केले.सुनील आहेर सरांचा आज सलग वृक्षारोपण करण्याचा 659 वा दिवस आहे त्यांनी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना… प्रत्येकाने किमान एक-दोन झाडे लावावीत व त्याचे जतन करावे.असे सांगितले व मुख्याध्यापक सौ.प्रतिभा सागर मॅडम यांनी आव्हाहन केले.सर्वच प्रकारचे प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरण संवर्धन काळाची गरज आहे.यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे मुख्याध्यापक श्री.डी.आर.आहेर यांनी आवर्जून सांगितले.यानिमित्ताने चित्रकला पोस्टर स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या.यावेळी सर्व कर्मचारी विद्यार्थी,विद्यार्थीनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here