जमलं तर बघा

0

विषय -दत्तात्रय डुंबरे वय 37 हे दोन्ही किडनी खराब झाल्यामुळे उद्भवलेल्या आजाराशी झगडत आहेत.मी चांगुणा ज्ञानदेव डुंबरे (वय- 64) राहणार – ओतूर (डुंबरवाडी), तालुका- जुन्नर, जिल्हा- पुणे येथील रहिवासी असून मिलिटरी नोकरीत नाईक पदावर असलेले निवृत्त कै. ज्ञानदेव डुंबरे यांची पत्नी आहे.सध्या माझा मुलगा दत्तात्रय डुंबरे (वय-37) हा आमच्या 6 जणांच्या कुटुंबातील एकटाच कमवता असून काही दिवसांपासून तो किडनी फेल ह्या शारीरिक आजाराने ग्रस्त आहे आणि सध्या त्याच्या दोन्ही किडन्यांचे कार्य थांबलेले आहे. यासाठी डॉक्टरांनी *तातडीने किडनी प्रत्यारोपण करण्यास सांगितले आहे.*
दत्ताला उद्भवलेल्या ह्या आजारावरील उपचारासाठी साठी त्याचा भाऊ किडनी देण्यासाठी तयार असून आम्ही जीएचसी हॉस्पिटल, ठाणे (मुंबई) येथे उपचार करण्याचे नियोजन करत आहोत. परंतु या उपचारासाठी अंदाजे खर्च दहा लाखांपेक्षा जास्त (हॉस्पिटल डिस्चार्ज नंतरचा खर्च गृहीत धरता) होणार आहे.मागील दोन वर्षांमध्ये आमच्या कुटुंबातील व्यक्तींच्या वैद्यकीय उपचारावर 6 लाखांपेक्षा जास्त खर्च झाला आहे. आणि हा सर्व खर्च आम्ही इन्शुरन्स व आमची बचत रक्कम यातून केला. दत्ताच्या आजारासाठी सुद्धा आत्तापर्यंत बराच खर्च झाला असून आमच्याकडे असलेली बचत आता संपलेली आहे.मी स्वतः ज्येष्ठ नागरिक असून माझे पती हयात नाहीत आणि माझ्याकडे सध्या उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही आणि आमची सध्याची स्थिती हलाखीची आहे. तरी या उपचारासाठी मला तुमचे आशीर्वाद आणि सहकार्याची गरज आहे.
माझ्या नातेवाईकांनी यामध्ये मोलाचा वाटा उचलून मला साथ देत आहेतच परंतु *येत्या काही दिवसांमध्ये आम्हाला अजून 4 लाख रुपयांची गरज असल्यामुळे मी आवाहन करते की तुम्ही तुमच्या परीने जशी आणि जेवढी मदत शक्य असेल तेवढी करण्याचा प्रयत्न करा ही माझी तुम्हाला आदरपूर्वक विनंती आहे.माझ्या मुलाच्या वैद्यकीय माहितीसाठी तुम्ही डॉ. शशांक फापाळे यांच्याशी 9860328016 ह्या नंबरवर संपर्क साधू शकता तसेच डॉ. फापाळे हॉस्पिटल (पाइल्स आणि जनरल सर्जरी), ओतूर किंवा पाइल्स क्लिनिक, मंचर येथे भेट देऊ शकता.कृपया आपण GPay किंवा PhonePe वरून मदत करू शकता-* *Gpay / Phonpe Number – 9769685268 (Dattatray Dumbre)

बँक खाते माहिती –
खातेदाराचे नाव : Dattatray D Dumbre
बँकेचे नाव: Bank of Baroda
खाते नंबर : 04100100011989
IFSC Code: BARB0PRINCE
बँक शाखा नाव: Princess street
बँकेचा पत्ता:
Bank of Baroda
0410 princess street, 400002,
185/184 Mulji Jetha Bldg 1St Floor, Princess Street Mumbai – 400002कृपया तुम्ही केलेल्या मदतीची पावती 8308844855 या नंबर वरती पाठवा.मी सदैव तुमची ऋणी राहील. आपले खुप खुप आभारी आहे. 🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here