वासोळ सोसायटीच्या अध्यक्षपदी रमेश सुर्यवंशी तर उपाध्यक्षपदी भवानसिंग गिरासे

0

नाशिक : ( प्रशांत गिरासे वासोळ) वासोळ विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी वासोळचे मा.सरपंच,जनसामान्यांचे कैवारी संतोष सुर्यवंशी यांचे लहान बंधू रमेश सुर्यवंशी तर उपाध्यक्षपदी भवानसिंग गिरासे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.कै.संतोष अण्णा सुर्यवंशी जय सिद्धेश्वर पॅनलचे सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आणण्यात यश आले होते.अध्यक्ष पदासाठी आणि उपाध्यक्ष पदासाठी एक- एक अर्ज दाखल झाल्याने रमेश सुर्यवंशी व भवानसिंग गिरासे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.कायमस्वरूपी शेतकरी हिताचे निर्णय घेण्यास सक्षम राहील असे नवनिर्वाचित अध्यक्ष रमेश सुर्यवंशी यांनी सांगितले.यावेळी संचालक शिवाजी अहिरे,मनोज भामरे,जगन्नाथ भामरे,छबुबाई केदारे,कलाबाई बच्छाव,जालिंदर शेवाळे,रघुनाथ महाले,ज्ञानेश्वर गिरासे,रामदास सुर्यवंशी आदींसह पॅनलचे नेतृत्व कैलास बाबुराव भामरे,अशोक निकम मा.अध्यक्ष स्वप्नील सुर्यवंशी उपस्थित होते.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुजय पोटे यांनी कामकाज पाहिले व त्यांना सचिव प्रताप गिरासे यांनी सहाय्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here