चंद्रपूर- 14 नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म दिवस सम्पूर्ण भारतात बालदिवस म्हणून साजरा केला जातो. पंडित नेहरू म्हणतात की मुले ही देशाचे भविष्य आहे त्यामुळे त्यांचे संगोपन प्रेमाने व्हायला पाहिजे. अश्याच प्रेमाची आस अनाथ बालकाना सुद्धा असते आणि याच प्रेमाची पूर्तता करण्याच छोटासा प्रयत्न विठाई बहुउद्देश्यीय संस्था नेहमी करत असते.बालदिनाचे औचित्य साधून विठाई ने अनाथलयातील मुलांसोबत “बाल दिवस” साजरा केला… उज्वल भारताचे उद्या चे भविष्य असलेल्या बालाकानवर चांगले संस्कार व्हावे या उद्देशाने सर्वप्रथम आश्रमातील मुला समवेत सर्वानी “इतनी शक्ति हमें देना दाता ” ही प्रार्थना घेतली सोबतच राष्ट्रीय प्रतिज्ञा घेऊन त्याचा अर्थ मुलाना सांगण्यात आला. त्याचा मानसिक आणि शारीरिक विकास व्हावा या दृष्टी ने वेगवेगळया स्पर्धा घेण्यात आल्या.. थोर पुरुषांचा इतिहास माहिती होण्या करीता प्रत्येकाला त्यांच्या वया नुसार थोर पुरुषाची पुस्तके भेटस्वरूपात देण्यात आली..अनाथालायातिल मुलाना ब्लैकेट्स आणि दिवाळी चा फराळ जेष्ठ सदस्य श्रीमती विठाबाई काहिलकर आणि सौ संजीवनी कुबेर यांच्या हस्ते देण्यात आलें . सायंकाळी केक कापून, त्यांच्या सोबत स्नेह भोजन करुन त्यांचा आनंद द्विगुणीत करण्यात आला.संचालन कीर्ति नगराले यांनी केले.कार्यक्रम यशस्वीते साठी संस्थेचे अध्यक्ष महेश काहिलकर, ओमप्रकाश मिसर, दिनेश जुमड़े, चेतन जनबंधु, रविंद्र कश्यप,विशाल मंत्रीवार,सागर जोगी, विनोद आत्राम,भारती कश्यप, कीर्ति नगराले, माधुरी काहिलकर,रश्मि वैरागड़े,वैशाली बावने, सुषमा मोकले, भारती जिराफ़े, लक्ष्मी आत्राम, अभिलाषा खटिक,शारदा काहिलकर यांनी मेहनत घेतली.