बार्टी तर्फे एम.पी.एस.सी. परीक्षेसाठी ऑनलाईन कोचिंग क्लास सुरू- धनंजय मुंडे

0

मुंबई दि. 2 . डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (बार्टी ) मार्फत महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांसाठी एम.पी.एस.सी. परीक्षेसाठी ऑनलाईन कोचिंग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.करोनामुळे खूप एमपीएससी इच्छुक विद्यार्थी याबाबत मागणी करत होते. त्यानंतर मुंडे यांनी बार्टीला याबाबत ऑनलाइन क्लासेस सुरू करावे अशा सूचना दिल्या होत्या.त्या अनुषंगाने बार्टी ने स्वत: पुढाकार घेऊन ऑनलाइन एमपीएससी क्लासेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.एम. पी.एस.सी. इच्छुक उमेदवारांकडून यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्यासाठी बार्टी, पुणे या www.barti.in या संकेतस्थळावर नोटीस बोर्ड वरील “एम.पी.एस.सी. परीक्षा मार्गदर्शन वर्गासाठी प्रवेश अर्ज या लिंक वर क्लिक करावे. ऑनलाईन कोचिंग चे बार्टीचे फेसबुक पेज व चुट्यूब चैनल वरून लाईव्ह स्ट्रिमिंग करण्यात येणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी आज पासून नोंदणी सुरू करावी असे आवाहन करण्यात आले आहे.पुढील आठवड्यात हे क्लासेस सुरू होतील अशा दृष्टीने नियोजन करावे अशा सूचनाही मंत्री महोदयांनी दिल्या आहेत.  तर सर्व तयारी करून पुढील आठवड्यात याचे उदघाटन करण्यात येणार असल्याचे बार्टीचे महासंचालक कैलास कणसे यांनी सांगितले असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here