धुळे (प्रतिनिधी भाग्यश्री बागुल) : – 1 जुलै 2020 रोजी सायंकाळी राजस्थान हुन एक माल ट्रक क्रमांक MP – 44 – HA – 0547 याच्या मध्ये अफूचे बोंडे असलेला माल कर्नाटक येथे घेऊन जात असल्याची माहीती गुप्त बातमी दारा मार्फत शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे स पो नी अभिषेक पाटील यांना मिळाली असता . त्यानुसार पाटील यांनी महामार्ग क्र 3 वर सेंधव्या कडून येणाऱ्या रस्त्यावर नाका बंदी करत सापळा लावला त्या दरम्यान सायंकाळी 7 वाजता वरील क्रमांक असलेली ट्रक थांबवत चालकाची विचारपूस करण्यात आली परंतु चालकाने काहीच उडवा उडवीचे उत्तरे द्यायला लागल्या मुळे पोलिसांनी गाडीची तपासणी करत टपावर असलेल्या भागात पाहणी केली असता तेथे एक लोखंडी झाकण दिसून आले ते उचकटून पाहत त्यात एक छुपा कप्पा मध्ये काळया व पांढऱ्या रंगाच्या गोण्या मधे अंमली पदार्थ दिसुन आले . 104 . 700 किलो वजनाचे सुमारे 10 लाख 47 हजार रुपय किंमती चे अफूचे सुकलेले बोंड व 20 लाख रुपये किमतीचे ट्रक असा 30 लाख रुपय किमतीचा मुद्देमाल हस्तगत करत चालक रघु दायमा याला पण अटक त्याच्या विरोधात शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सदर ची कारवाई जी . पो .आ . चिन्मय पंडित , अपर पो . आ . डॉ . राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शन खाली कारवाई करण्यात आली.