अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर जिल्हा) महाराष्ट्रातील धनगर समाजाचे नेते हे “सरकार सकारात्मक”आहे अशा बाता मारून गेली सत्तर वर्षे धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सपशेल अपयशी ठरल्याने धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी आता थेट रिपब्लिकन नेते आणि केंद्रीय समाज कल्याण मंत्री नामदार रामदासजी आठवले यांनाच धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी साकडे घातले आहे. बीड येथील एका कार्यक्रमासाठी ना.आठवले हे आले असताना धनगर समाजाचे कार्यकर्ते प्रकाश सोनसळे यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने नामदार रामदासजी आठवले यांची भेट घेऊन थेट केंद्रातूनच धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठीची विनंती केली आहे. गेली सत्तर वर्षे धनगर समाजाला डॉ बाबासाहेबआंबेडकर यांनी घटनेत छत्तीस क्रमांकावर एसटी आरक्षण दिलेले असतानाही सर्व पक्षातील राज्यकर्त्यांनी धनगर समाजाचा आरक्षण देतो म्हणून फक्त मतासाठीच धनगर समाजाचा वापरच करून घेतला असुन महाराष्ट्रातील तमाम धनगर समाजाच्या तोंडाला पाने पुसली आहेत. धनगर समाजाला आरक्षणाच्या बाबतीत सर्व पक्षांनी फसवले आहे याची जाणीव करुन देत ना.आठवलेंना तुम्ही तरी या बाबतीत लक्ष घालून रिपब्लिकन पार्टीचे नाव उज्वल करण्यासाठी धनगर समाजाला न्याय मिळवून द्यावा म्हणून एका निवेदनाद्वारे विनवणी केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात धनगर समाजाचे राज्यभर चोंडी, मीरी, दहीवडी,अंबड, माळशिरस येथे आंदोलने सुरु असून सरकार फक्त तिन महीने वेळकाढूपणा करून धनगर समाजाची दिशाभूल करण्यासाठी आणि आंदोलने चिरडून टाकण्यासाठी आणि हाणून पाडण्यासाठी आदिवासी नेत्यांना विरोधासाठी पुढे करीत असल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला आहे.गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाज एसटी आरक्षणासाठी झटत आहे पण सरकार हेतुपुरस्कर काही अंमलबजावणी करत नाही म्हणून आपण केंद्रातील मंत्री आहात ईतर मंत्री महोदयांची आरक्षणासाठी बैठक बोलावून तमाम धनगर समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे. हे निवेदन देण्यासाठी सुदर्शन भोंडवे, नारायण भोंडवे, अमोल भोंडवे, शाम गाडेकर,विलास महानवर,भारत गाडे,संपत करे हे धनगर समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते. चौंडीतील उपोशनार्थीनी असा आरोप केला आहे की काही धनगर समाजाच्या नेत्यांनी धनगर समाजाला अनेक पक्षाच्या दावणीला बांधून धनगर समाजाची फक्त फसवणूकच केली आहे.त्यांनी समाजाच्या नावावर स्वतःचे भले करून घेतले आहे. अनेक जण स्वतःला लायकी नसतानाही धनगर समाजाचे नेते म्हणून घेत आहेत. आणि आपल्याच हाताने स्वतःच्या टिरी बडवून घेत स्वतःला स्वयंघोषित नेता म्हणून घेउन सर्व सामांन्य समाजाचा खोल दरीत कडेलोट करून समाजाला देशोधडीला लावत आहेत. सरकार कडून धनगर समाजाच्या मतावर डोळा ठेवून सवंग लोकप्रियते साठी नुसत्या घोषणा करुन घेऊन समाजाची फसवणूकच केली जात आहे. धनगर समाजाला सरकारने केलेल्या घोषणांचा एक छदामही सर्व सामांन्याच्या घरापर्यंत पोहोचला नसून हे समाजाच्या लक्षात आले आहे म्हणून तर संपूर्ण धनगर समाज आता आक्रमक झाला आहे. प्राण गेला तरी चालेल पण आता आरक्षण मिळाल्या शिवाय माघार नाही अशी भुमिका चोंडीतील उपोशनार्थीनी घेतली आहे. सरकारला धनगर समाजाला आरक्षण द्यायचे नाही म्हणून सरकार सर्व समाजाला वेड्यात काढत असल्याचे काम करीत आहे.असा आरोप समाजातील सर्व स्तरातून होत आहे. संपूर्ण राज्यभर,तालुका, गाव, वाड्या,वस्त्यांवर साखळी उपोशनाला सुरुवात झाली असून तमाम धनगर बांधव आता आक्रमक झाल्याचे संपूर्ण राज्यभर दिसत आहे. काही तरी ठोस निर्णय सरकारने घेऊन हे आंदोलन थांबवन्याची मागणी इतर समाजातील नेते खाजगीत बोलताना करत आहेत. “सरकार आरक्षण देता की सत्तेवरून जाता”हा नारा संपूर्ण राज्यभर भंडारा उधळून दिला जात आहे. धनगर समाजाच्या आंदोलनामुळे संपूर्ण राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Home Breaking News आरक्षण मिळवून देण्यासाठी “सरकार सकारात्मक”च्या बाता मारणारे धनगर नेते अपयशी ठरल्याने धनगर...