नांदगांव : रणखेडा चांदोरा पिंपरखेड पिंपरखेड तांडा आटकाट तांडा जळगाव खुर्द डॉक्टर वाडी बाबुळवाडी चिंचविहीर जळगाव खुर्द व पोखरी आदि गाव मिळून आज पिंपरखेड येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.पिंपरखेड ग्रामपंचायत समोरील प्राणांगणात आज आमदार आपल्या दारी शिबिर संपन्न झाले याप्रसंगी परिसरातील गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध सुविधांचा लाभ घेतला.आमदार आपल्या दारी या अभियान अंतर्गत नागरिकांना मोफत आरोग्य सुविधा तसेच मोफत शासकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात.मोफत डोळे तपासणी, आरोग्य तपासणी, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मोफत रेशन कार्ड व इतर शासकीय दाखले काढून दिली जातात. मतदारसंघातील प्रत्येक गावात आमदार आपल्या दारी अभियान राबवले जात असून आता पर्यंत हजारो नागरिकांनी लाभ घेतला आहे,या प्रसंगी मा.सभापती विलास भाऊ आहेर, किरण भाऊ देवरे, किरण भाऊ कांदे, अमोल नावंदर,सरपंच पिंपरखेड सौ.मंजुषा गरुड, रमेश मामा काकळीज, जीवन गरुड, देशमुख सर, संदीप मवाळ, नवनाथ सोमवंशी, दीपक मोरे, बाबासाहेब गरुड, राजेंद्र गरुड, एकनाथ पाटील, जालम आहेर, संजय आहेर, शिवाजी बछाव, शिवाजी सुरासे, जिभाऊ पवार, रवींद्र गायकवाड, मनोज बछाव, शांताराम शिंदे, गणेश घोटेकर, शरद शिंदे, शिवाजी जाधव, उमेश मोरे, रामेश्वर तुरकुने, किशोर नवले, रमेश दळवी, उत्तम चव्हाण, मगण चव्हाण, माधवराव गरुड, पतींगराव देशमुख, दिनेश गरुड, भाईलाल दळवी, जनार्दन पवार अमोल पाटील, मनोज देशमुख, भरतआबा शेलार, बाबा ढोमासे, गिरधारी भालेकर प्रमोद देशमुख, बाळासाहेब गुंजाळ, सागर हिरे, भाऊराव बागुल, आण्णा मुंढे दीपक शेलार, आदींसह विविध गावातील सरपंच, चेअरमन, तसेच ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.