गलवानची घटना संरक्षण मंत्रालयाचे अपयश नाही, शरद पवारांकडून केंद्र सरकारची पाठराखण

0

सातारा. भारत आणि चीनदरम्यान सीमेवर वाद सुरुच आहे. यावर काँग्रेस आणि भाजपमध्ये शाब्दीक युद्ध सुरू झाल आहे. आता या मुद्द्यावर माजी संरक्षणमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख शरद पवार यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची पाठराखण केली आहे. शनिवारी शरद पवार म्हणाले की, देशाच्या सुरक्षेचे राजकारण व्हायला नको. आपल्याला हे विसरुन नाही चालणार की, 1962 च्या युद्धानंतर चीनने जवळ-जवळ 45,000 वर्ग किलोमीटर भारतीय भूमीवर ताबा मिळवला होता.

राहुल गांधींच्या प्रश्नाला उत्तर देताना पवारांनी हे विधान केले

शरद पवारांचे हे वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधींच्या त्या आरोपानंतर आले आहे, ज्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘सरेंडर मोदी’ म्हणत, आरोप लावला होता की, मोदींना भारताच्या सीमेला चीनला समर्फित केले. 15 जूनच्या रात्री पूर्व लद्दाखमध्ये चीनी सैन्यासोबत झालेल्या हिंसक चकमकीनंतर भारताचे 20 जवान शहीद झाले होते. प्रत्युत्तरात भारतानेही चीनचे अनेक सैनिक मारले.

भारतीय सैन्य सीमेवर नेहमी सतर्क असते

पवार पुढे हेदेखील म्हणाले की, लद्दाखमध्ये गलवान घाटीच्या घटनेला लगेच संरक्षण मंत्रालयाचे अपयश म्हणता येणार नाही, कारण भारतीय सैनिक सीमेवर नेहमी सतर्क असतात. साताऱ्यात माध्यमांशी बोलताना पवारांनी म्हटले की, हे संपूर्ण प्रकरण अतिशय संवेदनशील आहे. चीनकडून गलवानमध्ये भारताला डिवचण्याचा प्रयत्न झाला आहे.

दिल्लीत बसलेल्या संरक्षण मंत्र्याचे अपयश नाही

पवार पुढे म्हणाले की, “भारत आपल्या सीमेत गलवान घाटीत एक रस्ता बनवत होता. चीनी सैनिकांनी यात अडथळा आणला. यादरम्यान आपल्या सैनिकांसोबत धक्काबुक्की झाली. हे कोणाचे अपयश नाही. जर पेट्रोलिंगदरम्यान कोणी आपल्या देशात घुसले, तर आपण याचे खापर दिल्लीत बसलेल्या संरक्षण मंत्र्यांवर फोडू शकत नाही.”

पुढे म्हणाले की, “तिथे पेट्रोलिंग सुरू होती. लढाई झाली, याचा अर्थ भारतीय सैनिक सतर्क होते. जर भारतीय सैनिक सतर्क नसते, तर चीनी सैनिक कधी भारतात घुसले, समजलेही नसते. त्यामुळे मला वाटत नाही की, अशावेळी फक्त आरोप करणे बरोबर आहे.”

त्या वेळेस खूप मोठा जमिनीचा तुकडा त्यांनी घेतला

राहुल गांधींकडून लावलेल्या आरोपाला उत्तर देताना पवार म्हणाले की, दोन्ही देशामध्ये 1962 ला झालेले युद्ध कोणीच विसरू शकत नाही. यात चीनने भारताच्या 45,000 वर्ग किमी जमिनीवर कब्जा केला होता. ती जमीन आताही चीनकडे आहे. मला आता माहित नाही की, चीनने परत कोणत्या क्षेत्रावर अतिक्रमण केले आहे का नाही. पण, जेव्हा मी एखादा आरोप लावतो, तेव्हा मला लक्षात घ्यायला हवं की, मी सत्ते होतो, तेव्हा काय झाले होते. त्यावेळी इतक्या मोठ्या जमिनीच्या तुकड्यावर चीनने कब्जा केला, हे विसरुन चालणार नाही. अशावेळी राजकारण करणे योग्य नाही.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here