सोलापूर (प्रतिनिधी) : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांशी लढताना सीआरपीएफ जवान सुनील काळे शहीद झाले. या वीर जवानावर पानगांव येथे बुधवारी सकाळी शोकाकुळ वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. वीरमरण आलेल्या जवान सुनील काळे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठ्या संख्यने ग्रामस्थांचा जनसमुदाय जमला होता. यावेळी अनेकांच्या अश्रुंना बांध फुटला होता. अखेरचा निरोप देताना वातावरण सुन्न झाले होते. एकदम शोकाकुळ वातावरण झाले होते.
दहशतवाद्यांच्या चकमकीत सुनील काळे यांना वीरमरण आले. जवान सुनील काळे यांनी दोनअतिरेक्यांना ठार करण्यात महत्वाची भूमिका बजावली. काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी कारवाई सुरु असताना दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत सीआरपीएफ जवान सुनील काळे हे शहीद झाले.
मंगळवारी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथील बंडजू भागात सुरक्षा दलाने दहशतवादी लपलेल्या ठिकाणाला घेराव घातला. यावेळी दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. यावेळी जवान सुनील काळे यांनी चोख पत्त्युतर दिले. त्यावेळी ते गंभीर जखमी झाले होते. त्यांनी दोन दहशवाद्यांना ठार करण्यात यश मिळवले. त्यानंतर ते शहीद झाले.