चिंतामणी लॉन्स मनमाड येथे आमदार आपल्या दारी शिबिर संपन्न

0

मनमाड : आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या स्वखर्चातून विविध सुविधा पुरविण्यात येत आहेत.आमदार आपल्या दारी या महा शिबिरातून हजारो नागरिक विविध सुविधांचा लाभ घेत आहेत,सामान्य नागरिकांना विविध आजार तपासणी, उपचार, औषधे मोफत दिली जात असून शासकीय योजनांचा लाभ तात्काळ मिळवून दिला जात आहे.चिंतामणी लॉन्स मनमाड येथे मोठ्या संख्येने नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला आमदार सुहास आण्णा कांदे यांनी उपस्थित राहून शिबिराची सुरुवात केली. या प्रसंगी बोलतांना प्रत्येक नागरिकांची आरोग्याची काळजी घेणे तसेच त्यांना आवश्यक असलेली शासकीय सुविधा घरपोच उपलब्ध करून देऊन त्यांचा होणार त्रास कमी करणे हाच प्रामाणिक हेतू ठेवून संपूर्ण मतदारसंघात हे महशिविर राबविले जात असल्याचे सांगितले.
आधीच्या आलेल्या प्रकरणातून आज झालेल्या शिबिरात अपंगत्वाचा दाखले, रेशन कार्ड , निराधार योजना प्रमाणपत्र लाभार्थ्यांना वाटण्यात झाले. या प्रसंगी सर्व आजारांचे तज्ञ डॉक्टर, डोळे तपासणी , मोफत चष्मे, इतर सामान्य आजार तपासणी व मोफत औषधे देण्यात आली तर सर्व शासकीय योजनांचे स्टाल लावण्यात आले होते. तहसील विभाग, पंचायत समिती विभागाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या त्वरित सोडवण्यात आल्या. रेशन कार्ड संबंधी सर्व अडचणी, निराधार योजना, इतर दाखले यात सामील आहेत.युवासेना जिल्हाप्रमुख फरहान (दादा) खान, उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे, तालुकाप्रमुख साईनाथ गिडगे, शहरप्रमुख मयूर बोरसे, मा.नगराध्यक्ष राजाभाऊ आहिरे, राजेंद्र पगारे, बबलू पाटील, जेष्ठ नेते अल्ताफबाबा खान, युवासेना शहरप्रमुख योगेश इमले, आसिफ शेख, वैद्यकीय मदत कक्ष विकास वाघ, विधानसभा संघटक जाफर मिर्झा, नगरसेवक संतोष आहिरे संजय निकम इरफान मोमीन शिवसेना शहर सचिव बापू वाघ सर उपप्रमुख गुलाब जाधव, माजी नगरसेवक अमजद पठाण, अमिन पटेल, गालिब शेख, दऊ तेजवाणी, पिंटू शिरसाठ, आप्पा आंधळे, राकेश ललवाणी,उमेश ललवाणी, विलास परदेशी, गोकुळ परदेशी, विकी कातारी,अनिल पवार, बंटी शाह, सुभाष माळवतकर, ललित रसाळ, महेंद्र वाघ, लोकेश साबळे, लाला नागरे, रिपाई सचिव प्रमोद अहिरे रवींद्र खैरनार शिरीष पगारे, वैद्यकीय मदत कक्षेचे सुनील साळवे, अतुल वानखेडे, तमिज पठाण, मन्नू शेख, ऋषिकांत आव्हाड, अजिंक्य साळी, सनी बागुल, सिद्धार्थ छाजेड, निलेश व्यवहारे, सचिन दरगुडे, कुणाल विसापूरकर आदीसह
शिवसेना महिला आघाडी च्या सर्व पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते .लाभार्थी आकडेवारी
👇👇👇👇👇
डोळे तपासणी १२४६
चष्मे वाटप १०८३
रेशन कार्ड प्रकरण २४२
निराधार योजना १६
उत्पन्न दाखले १२८
जातीचे दाखले ५४
Domocile ३६
MD Medicine १०२
Orthopaedic १७८
Cardio १२६
बाल रोग तज्ञ ५२

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here