नाशिक, (दि.१२.६.२०२३) : भारत सरकारने अंमली पदार्थाच्या धोक्याविरुद्ध लढण्यासाठी ‘ड्रग्स मुक्त भारत’ चा संकल्प केला आहे. त्याअनुषंगाने राज्यात ‘नशामुक्त भारत’ पंधरवाडा उपक्रमांतर्गत व्यापक स्तरावर उपाययोजना करण्याचे निर्देश सामाजिक न्याय विभागाने दिले आहेत. सदर नशामुक्त भारत पंधरवाडा अभियान अंतर्गत जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत मोक्ष फाऊंडेशन पाथर्डी फाटा नाशिक येथील व्यसनमुक्ती केंद्रात नशा मुक्तीची शपथ घेऊन या उपक्रमास प्रारंभ केला आहे.जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री.योगेश पाटील यांनी नशामुक्त भारत पंधरवाडा उपक्रमाची माहिती करुन दिली. यावेळी मोक्ष फाँडेशन संस्थेचे सचिव श्री.सवियाल डिक्रुझ, समाज कल्याण निरीक्षक श्रीमती मनीषा गांगुर्डे, यांच्यासह जिल्हा परिषद समाज कल्याण कार्यालयाचे कर्मचारी मोठ्या संखेने उपस्थित होते. व्यसनमुक्ती केंद्रात दाखल युवकाने यावेळी उपस्थितांना नशा मुक्तीची शपथ दिली.श्री जोशी यांनी प्रास्तविक केले प्रसंगी काही व्यसनमुक्त युवकांनी मनोगत व्यक्त केले,श्री वैभव पाटील यांनी वर्क थेरपी विषयी माहिती दिली गीता गायकवाड यांनी व्यसन मुक्ती कार्यक्रमासोबत व्यसनविरोधी कार्यक्रमाची अंमलबजावणी महत्त्वाचे असल्याचे सांगितले. सायकॉलॉजीस्ट श्रीमती रश्मी यांनी मानसशास्त्रीय समुपदेशनाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रम यशस्वी ते करिता इन्चार्ज करुणा मॅडम जे पी पाटील तसेच सर्व मोक्ष कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.
——————————————