हैदराबाद : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रविण पवार यांनी हैदराबादमध्ये तेलंगणा इथे G-20 आरोग्य कार्यकारी गटाच्या तिसऱ्या बैठकीच्या उद्घाटन सत्राला संबोधित केले. केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रा. एस पी सिंह बघेल यावेळी उपस्थित होते.मा.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली G20 अध्यक्षतेची संकल्पना म्हणजे, “एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य” देखील सार्वत्रिक आरोग्याच्या व्यापक संकल्पनेला सूचित करते. आरोग्य आणीबाणीची तयारी, प्रतिबंध आणि प्रतिसाद, वैद्यकीय क्षेत्रातली आव्हाने, डिजिटल हेल्थ याविषयी, जागतिक आरोग्य तज्ञांमध्ये सुरू असलेल्या समांतर चर्चां खूप महत्त्वाच्या असून यामध्ये सर्वांनी एकत्रित येण्याची गरज असल्याचं असेही डॉ. भारती पवार यांनी यावेळी सांगितले.
Home Breaking News केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रविण पवार यांनी हैदराबादमध्ये...