छत्रपती संभाजीमहाराज नगर : (औरंगाबाद) येथे रोशनी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल 2023 चे भव्य आयोजन करण्यात आले होते. या फिल्म फेस्टिवलमध्ये जगभरातून सहभागी झालेल्या अनेक चित्रपट आणि लघुपटांचे सादरीकरण करण्यात आले होते.जगभरातील चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ मंडळी,कलाकार, दिग्दर्शक,समीक्षक आणि चित्रपटप्रेमींची उत्स्फुर्त उपस्थित लक्षनिय होती.या चित्रपट महोत्सवातील स्पर्धेत प्रबोधनात्मक सामाजिक बांधिलकी जपणारे तरुण तडफदार लेखक आणि दिग्दर्शक अभिनेता सुराज कुटे यांना भिंडी या लघुपटासाठी उत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार प्रदान करुन गौरविण्यात आले.क्षणभंगुर मानवी जीवनाच्या अनाकलनिय तत्वज्ञानावर आधारित असलेल्या त्रिशूलीन सिने विजन प्रस्तुत भिंडी या हिंदी भाषिक लघुपटाचं दिग्दर्शन तसेच कथा,पटकथेच लिखाण सुराज कुटे यांनी केलं आहे तसेच प्रसिध्द सिने अभिनेत्री तमन्ना यांनी सदर लघुपटात सहज सुंदर अभिनय केला आहे.
भिंडी या लघुपटाच वैशिष्ट्य म्हणजे दिग्दर्शक सुराज कुटे यांनी फक्त एकाच पात्राचा वापर करून या सस्पेन्स ड्रामा असलेल्या गुढ नाटकिय लघुपटला साकारलं आहे.दिग्दर्शक सुराज कुटे यांनी अनेक म्युझिक अल्बमच्या निर्मितीसोबतच अनेक लघुपटांच लिखाण आणि दिग्दर्शन केलं आहे. त्यांच्या ह्या विविध कलाकृत्या टी-सिरीज,झी मुझिक कंपनी,एम एक्स प्लेयर,अश्या जागतिक आणि नामांकित प्लॅटफॉर्म वर देखील झळकल्या आहेत.त्यांच्या लघुपटांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळविले आहेत.या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करतांना,चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून मानवी सामाजिक प्रबोधनाच देखील प्रभावी साधन आहे.आणि म्हणूनच सामाजप्रबोधनाच भान ठेवत.विविध विषयांना वाचा फोडत चित्रपट निर्मिती करीत राहण्याचा मनोदय सुराज कुटे यांनी या सन्मानाबद्दल आयोजकांचे आभार मानतांना व्यक्त केला.