नाशिक : दिनांक 10/12/2022 रोजी आय एम ए हॉल नाशिक येथे मर्दानी सोशल वेलफेअर फाऊंडेशन कडून “मर्दानी ” पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी मर्दानी सोशल वेलफेअर फाउंडेशन चे राष्ट्रीय संस्थापक मा .सचिनदा गांगुर्डे सौ. तेजल ताई गांगुर्डे विखे पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्रातुन 4 महिलांना त्याच्या सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक योगदानाबद्दल मर्दानी पुसरस्कार देऊन गौरवित केले . सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार गीताताई गायकवाड यांना देण्यात आला गेली 18 वर्षे गीताताई गायकवाड सामाजिक चळवळीत कार्यरत असून आजगायत अनेक राष्ट्रीय पुरस्काराने त्यांना विविध संस्थांकडून गौरविण्यात आले आहे.पुरस्कारा बद्दल महिला बाल कल्याण अधिकारी श्री अजय फडोळ , मर्दानी सोशल फाउंडेशन च्या सचिव मनीषा ताई जोंधळे तसेच अंगणवाडी विभागाच्या कर्मचारी वर्ग व विविध सामाजिक संस्थांनी अभिनंदन केले.