पॅरिसा कम्युनिकेशन आयोजित डिजेल्स इव्हेण्ट मिस व मिसेस सौंदर्यवती- सौ.अंजुम सुहास कांदे

0

नाशिक : पॅरिसा कम्युनिकेशन आयोजित डिजेल्स इव्हेण्ट मिस व मिसेस सौंदर्यवती स्पर्धेत दिल्ली येथे झालेल्या ग्रँड फिनालेत देशभरातील विविध स्पर्धकांमध्ये मिसेस इंडिया वर्ल्ड  पुरस्काराने आमच्या आदरणीय वहिनी साहेब सौ.अंजुम सुहास कांदे यांना गौरवण्यात आले.महाराष्ट्र, कर्नाटका, आसाम, सिक्कीम,अरुणाचल प्रदेश, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, पंजाब, दिल्ली, हरियाणा या राज्यातून प्रत्येकी तीन स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला. सामाजिक उपक्रम सामान्य ज्ञान, सांस्कृतिक योजना, व्यक्तिमत्त्व विकास या निकषांवरती अंजुमवहिनी यांनी उत्तम गुण मिळवत किताब मिळवला.अंजुमवहिनी एक उत्तम गृहिणी, माता, यशस्वी व्यवसायिक, तसेच सेवाभावी समाजसेविका या विविध भूमिका त्या जबाबदार पणे यशस्वीरीत्या सांभाळतांना अंजुमताईनी नव्या युगाची प्रेरणा घेत सौंदर्य स्पर्धेत भाग घेत स्वतःला सिद्ध केले, महिला व युवतींना आपली संस्कृती, संस्कार, घर संसार सांभाळत नव्या युगातही स्त्री आपले कर्तृत्व सिद्ध करु शकते,क्षेत्र कोणतेही असो स्त्री ते आवाहन स्विकारण्याची क्षमता ठेवते ही प्रेरणा त्यांनी दिली आहे.या यशस्वी विजयानंतर जुलै महिन्यात साऊथ कोरिया येथे होणाऱ्या मिसेस वर्ल्ड 2022 स्पर्धेत भारताचे नेतृत्व करण्याचा मान अंजुम वहिनी यांना मिळाला आहे.समाज्याच आपण काही देण लागतो हि उच्च विचारसरणी समोर ठेवून सतत महिलांना स्वताच्या पायावर खंबिरपणे उभ राहाता यावे यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या,लहान निराधार बालकांना शिक्षणासाठी मदत करणाऱ्या ,सर्व महिलांसाठी आदर्श व प्रेरणास्थान असणाऱ्या अंजुमताईं कांदे यांना पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here