आमदार सुहासआण्णा कांदे यांचेकडून एस.टी.डेपो कर्मचाऱ्यांसाठी वॉटर फिल्टर भेट

0

मनमाड : ( प्रतिनिधी -निलेश व्यवहारे ) मनमाड एस.टी. डेपोत कर्मचारी संख्या मोठी असून येथील कर्मचाऱ्यांच्या पिण्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था नसल्याकारणाने कर्मचारी वर्गास अडचणीचा सामना करावा लागत होता. त्यामुळे एसटी डेपोतील सर्व कर्मचारी वर्गाच्या वतीने आमदार सुहासआण्णा कांदे यांच्याकडे स्वयंचलित वॉटर फिल्टर युक्त पेयजल सुविधा करून देण्याची प्रमुख मागणी एस.टी. कर्मचाऱ्यांनी केली होती. त्यांच्या या मागणीच्या अनुषंगाने आमदार सुहासआण्णा कांदे यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने स्टीलचे वॉटर फिल्टर मनमाड डेपोला सप्रेम भेट दिले होते. परंतु काही दिवसातच एस.टी. कर्मचारी संप झाल्याने त्यांची जोडणी व लोकार्पण करण्याचे राहून गेले होते. आता परत सर्व डेपो सुरळीत सुरू झाल्यानंतर त्याची संपूर्ण जोडणी करून लोकार्पण सोहळा उपजिल्हाप्रमुख संतोष भाऊ बळीत यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे जि. संघटक राजाभाऊ भाबड, शहरप्रमुख मयूरभाऊ बोरसे, संघटक लोकेश साबळे, महेंद्र गरुड, सचिन दरगुडे, महेश बोराडे, टगु दरगुडे, विलास शेळके, कुणाल विसापूरकर उपस्थित होते.कर्मचारी वर्गाच्या वतीने आगारप्रमुख लाडवंजारी साहेब,अनिल सानप, विजय शेळके, जना सरोदे, सुरेश शिलावट, रवी आरोटे, पगारे, अविनाश सरोदे, गौरव शिरोळे, चेतन जाधव, व इतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.यावेळी बोलतांना आगारप्रमुख लाडवंजारी साहेब यांनी कर्मचाऱ्यांच्या वतीने आमदार साहेबांचे धन्यवाद व्यक्त केले. शिवसेना पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत आभार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here