नविन पीढी सुसंस्कारित करणे ही काळाची गरज – आमदार राजळे

0

मुंबई : (सुनिल नजन/अहमदनगर)
आज नविन पीढी सुसंस्कारित करणे ही काळाची गरज आहे असा संदेश शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार मोनिकाताई राजळे यांनी दिला. त्या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र चिचोंडी येथे परमार्थीक संस्कार शिबिराचा समारोप करताना प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या. यावेळी माजीमंत्री शिवाजी कर्डिले, व्रुद्धेश्वरचे माजी संचालक चारुदत्त वाघ,पाथर्डी पंचायत समितीच्या सभापती सुनिता गोकुळ दौंड, पंचायत समिती सदस्य एकनाथ आटकर हे व्यासपीठावर उपस्थित होते. ह.भ.प.गणेश महाराज कुदळे यांनी किर्तनरुपी सेवेतून संदेश देत उपस्थित पालकाच्या डोळ्यात झंनझनीत अंजन घातले.आदिनाथ पालवे,लक्ष्मण जर्हाड,जयानंद आव्हाड, बबन गायकवाड, विनोद भिंगारदीवे,संदिप दाणवे,आबा गरुड, प्रमोद जर्हाड, संदिप गुगळे,महादेव गीते,भाउसाहेब पोटे,मिलके मेजर,आनंद शिरसाठ, श्रीकांत आटकर, विठ्ठल गायकवाड यांनी विषेश परिश्रम घेतले. या शिबिरात एकुण १२० मुलांना सुसंस्कारित केले.प्रतिनिधी सुनिल नजन,अहमदनगर जिल्हा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here