सोडतीत पात्र झालेल्या कामगारांना ३० दिवसात घरे द्या! सचिन अहिर यांची म्हाडाकडे आग्रही मागणी

0

मुंबई : जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई – : ज्या गिरणी कामगारांना सन २०१२ व २०१६ च्या सोडतीत घरे लागली आहेत.त्यांना किवा त्यांच्या वारसांना दहा-बारा वर्षे झाली तरी अद्याप घरे मिळालेली नाहीत,ही चिंताग्रस्त बाब असून आता अधिक काळ प्रतिक्षा करायला न लावता त्यांना ३० दिवसाच्या आत घरे देण्याचा विचार व्हावा,अशी आग्रही मागणी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष माजी गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांनी म्हाडाकडे केली आहे.
सचिन अहिर यांनी पुढे म्हटले आहे,गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळ (म्हाडा) सर्वसाधारण सोडत काढल्यानंतर जे पब्लिकसाठी नियम लावते,तेच नियम गिरणी कामगारांना लावणे अव्यवहारी ‌ठरेल.कारण सन २०१२ व २०१६ मध्ये सोडत लागलेल्या मधील ४०टक्के कामगार स्वर्गवाशी झाले आहेत आणि जे हयात आहेत ते वयोवृद्ध, व्याधीग्रस्त आहेत.तेव्हा कामगारांच्या वारसांना पुरावे गोळा करणे खार्चिक आणि त्रासदायक ठरत आहे.शिवाय म्हाडा प्रशासना कडून त्यांना अनेक वेळा हेलपाटे घालावे लागत आहेत.या गोष्टीचा विचार म्हाडाने मानवतेच्या भावनेने करावा.तेव्हा म्हाडा मुख्या धिकार्यांनी या प्रश्नावर कमी त्रासाचा मार्ग निवडून ही घरे किमान ३०दिवसात कामगार किंवा त्यांच्या वारसांना मिळतील अशा सूचना संबंधितांना द्याव्यात आणि या प्रश्नावरील कामगारांमधील असंतुष्ट वातावरण संपुष्टात आणावे,असे सचिन अहिर यांनी म्हटले आहे.
ज्या बॉम्बे डाईंच्या कामगारांना सोडत लागली आहे.त्यांना अनेक तांत्रिक अडचणी मुळे पत्र मिळणे अशक्य ठरले आहे,आशा कामगारांची पत्राची मुदत वाढवावी, अशी ही सचिन अहिर यांनी म्हाडा कडे मागणी केली आहे.सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनीही वरील दोन्ही मागण्यांचा म्हाडाने गांभीर्याने विचार करावा असे, म्हटले आहे.हे दोन्हीही प्रश्न राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे उपाध्यक्ष बजरंग चव्हाण यांनी संनियंत्रण समितीपुढे लेखी निवेदनाद्वारे मांडले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here