महर्षी भगवान वाल्मिकी बाईज क्रीडा मंडळ आयोजित नांदगाव तालुका पातळीवरील कबड्डी स्पर्धेत कुमार गटात भारतमाता क्रीडा मंडळ तर किशोर गटात समता क्रीडा मंडळ अंतिम विजेते

0

मनमाड : ( प्रतिनिधी -निलेश व्यवहारे ) मनमाड येथील महर्षी भगवान वाल्मिकी बाईज क्रीडा मंडळ आयोजित नांदगाव तालुका पातळीवरील कबड्डी स्पर्धेत कुमार गटात भारतमाता क्रीडा मंडळ तर किशोर गटात समता क्रीडा मंडळ अंतिम विजेते ठरले. कबड्डी खेळाचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देश्याने जयभवानी व्यायामच्या मैदानावर आयोजित या स्पर्धेचे उदघाटन माजी नगराध्यक्ष व नाशिक जिल्हा कबड्डी असो.चे कार्याध्यक्ष राजेंद्र पगारे यांच्या संपन्न झाले.तालुक्यातील संघांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. चुरशीच्या झालेल्या कबड्डी सामन्यांत कुमार गटात भारतमाता क्रीडा मंडळाने जयभवानी क्रीडा मंडळाचा पराभव करीत अंतिम विजेतेपद पटकाविले. तर किशोर गटात समता क्रीडा मंडळाने भारतमाता क्रीडा मंडळाचा पराभव करून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले.माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक ,माजी नगरसेवक अमिनभाई पटेल,डॉ.रवींद्र मोरे , पर्बत बहोत ,पप्पू पाटील ,शेखर आहिरे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.वाल्मीक बागुल यांनी पंचप्रमुख म्हणून तर राजेश निकुंभ,दत्तू जाधव पीटर फेरो विलास मोरे अमोल विन्सन कर केतन जाधव अंकुश गवळी मनोज अंकुश रोहन बागुल अमोल कातकडे भूषण दरगुडे यांनी पंच म्हणून काम पाहिले. महर्षी भगवान वाल्मिकी क्रीडा मंडळाचे भारत भाऊ बहोत,संजय चावरीया शरद भाऊ बहोत सोनू घोगले, विक्रांत बहोत, प्रशांत बहोत मुन्ना चावरीया, श्रीकांत बहोत, अभिषेक बहोत,मुन्ना बगाडे, विकास चावरीया ,क्षितिज बहोत, हर्षवर्धन बहोत,विवेक सोदे ,संजित किर,लक्की बगाडे, देव किर आदींनी स्पर्धा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.या स्पर्धेतून प्रत्येक संघाच्या तीन खेळाडूंची निवड करून त्यांना तज्ञ कबड्डी प्रशिक्षकांमार्फत कबड्डी खेळाचे शास्त्रोक्त प्रशिक्षण दिले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here