
मनमाड : ( प्रतिनिधी – निलेश व्यवहारे ) मनमाड शहर युवती युवासेने तर्फे मनमाड आगार व्यवस्थापक श्री पी लाडवंजारी यांची डेपोत जाऊन महिलाआघाडी उपजिल्हासंघटक संगिता बागुल, महिलाआघाडी तालुकाप्रमुख विद्याताई जगताप, नाजमा जाफर मिर्झा, युवती युवासेना तालुकाअधिकारी नेहा जगताप, उपतालुकाअधिकारी पूजा छाजेड, मनमाड शहर अधिकारी अंजली सूर्यवंशी, सॉफी सोनावणे, बुशरा शेख, कोमल भालेराव, शीतल आरने, शमीरा शेख, उज्वला मिसर, श्रुती मिसर, पायल मिसर, मानसी गंगेले, श्रेष्टी मिसर आदीं शिष्टमंडळाने भेट घेतली व कित्येक वर्षांपासून मनमाड ते माळेगाव बस सेवा बंद आहे. या बस सेवेमुळे वंजारवाडी, कर्ही, माळेगाव या गावातील विध्यार्थीनींची संख्या मोठी आहे. या सर्व परीसरातून साधारण 150 ते 200 विध्यार्थी शिक्षण घेण्यासाठी मनमाड शहरात येतात. त्यांना नियमित शिक्षणासाठी मनमाडला येजा करण्यासाठी एकही बस नाही. मागील काही वर्षांपूर्वी नियमित बस सेवा सुरू होती. पण काही कारणाने डेपोने ती बस सेवा तात्पुरत्या स्वरुपात बंद केली होती. परंतु नंतर पुन्हा ती बस सुरू न झाल्याने अनेक विध्यार्थीचे शिक्षण बस सेवे अभावी बंद झाले आहे. याची अनेकवेळा तक्रारी केलेल्या आहेत. तरी प्रशासनाने याची दखल घेतली नाही.
वंजारवाडी, कर्ही, माळेगाव येथील सर्व विध्यार्थी या समस्येमुळे आंदोलनाच्या तयारीत आहेत. कारण त्यांचे शिक्षणंच यामुळे बंद होण्याची वेळ आलेली आहे. तसेच परीसरातील शेतकरी बांधव व नागरिकांसाठीही बससेवा खूप गरजेची आहे. बससेवा चालू नसल्यामुळे ग्रामीण भागातील दळणवळणाला सुद्धा फटका बसला आहे.
बसथांबे बनवून तयार आहेत तरी नागरिकांना बससेवेची वाट पहावी लागत आहे. या सर्व बाबीं लक्षात घेऊन तसेच या प्रश्नाचा प्रशासनाने गांभीर्यपूर्वक विचार करून सदरील बससेवा त्वरित सुरू करावी ही मागणी युवती युवासेनेने निवेदनाद्वारे केली. चर्चेदरम्यान आगार व्यवस्थापक यांनी या बाबतीत सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच निर्णय घेण्यात येईल असे सांगितले.
