शाहू महाराज स्मृतिशताब्दी दिननिमित्ताने पंचायत समिती येवला येथे शाहू महाराजांना आदरांजली

0

येवला : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी )पुणे तसेच पंचायत समिती येवला यांच्या संयुक्त विद्यमाने शाहू महाराज स्मृतिशताब्दी दिननिमित्ताने पंचायत समिती येवला येथे शाहू महाराजांना आदरांजली वाहण्यात आली.शाहू महाराज यांच्या स्मृतिशताब्दी दिनाच्या अनुषंगाने 6मे 2022पासून हे वर्ष सामाजिक न्याय प्रेरणा वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे.यावर्षी राजर्षी शाहू महाराज यांनी केलेल्या सामाजिक समतेवर आधारित विविध उपक्रम वर्षभरात राबविण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून राजर्षी शाहू महाराज यांच्या विचार, कार्यप्रति आदर व्यक्त करण्यासाठी पंचायत समिती येथे शाहु महाराज यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.100मिनिटे स्तब्ध उभे राहून आदरांजली वाहण्यात आली.या आदरांजली सभेवेळी विचार मंचावर येवला पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अन्सार शेख साहेब, विस्तार अधिकारी भगवान बच्छाव, बी. के. अहिरे, बार्टीचे येवला तालुका समतादूत चंद्रकांत इंगळे, बालविकास अधिकारी कोकणी, आय.सी.डी.एस. विभागाच्या पर्यवेक्षिका वंदना शिंपी मॅडम, तसेच कार्यक्रमाला पंचायत समिती कर्मचारी, युवा गट सदस्य, नागरिक उपस्थित होते. शाहू महाराज यांनी सामाजिक न्याय समाजात रुजवण्यासाठी प्रयत्न केले. शिक्षण क्षेत्रात, पाणी, महिला, जाती निर्मूलन अशा वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. आज त्यांच्या विचार आणि कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी आपण सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन मा. बीडीओ अन्सार शेख यांनी यावेळी केले. चंद्रकांत इंगळे यांनी शाहू महाराज यांच्या विचार व कार्यावर प्रकाश टाकला. तसेच सामाजिक न्याय प्रेरणा वर्ष या उपक्रमाबाबत माहिती दिली. विस्तार अधिकारी भगवान बच्छाव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच आभार मानले.राष्टगीताने कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंचायत समिती कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बार्टीच्या समतादूत प्रकल्पाच्या नाशिक जिल्हा प्रकल्प अधिकारी प्रतिज्ञा दाभाडे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here