क्रांतीसुर्य जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर यांची ९१७ वी जयंती मोठ्या उत्साहात

0

मनमाड : १२ व्या शतकातील थोर समाज सुधारक, दक्षीणातील प्रबुद्ध, समतावादी लोकराजा, लिंगायत धर्मसंस्थापक क्रांतीसुर्य जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर यांची ९१७ वी जयंती मोठ्या उत्साहात शहरातील विविध भागात साजरी करण्यात आले. शहरातील नगरपरीषद कार्यालयामध्ये असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात महात्मा बसेश्वर यांचे प्रतिमेचे पूजन माजी नगरध्यक्ष आणि शिवसेना गटनेते गणेश धात्रक, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ.सचिनकुमार पटेल यांच्या हस्ते पूजन व पुष्पहार प्रतिमेस अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज जंगम यांनी केले .तसेच शहरातील आयुडीपी भागात असलेल्या महात्मा बसवेश्वर फलकाचे व प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी गोविंद लिंगायत, बाळासाहेब गोंधळे , नंदकुमार गोंधळे, कैलास वाडकर, नितीन गुळवे, विजय गोंधळे, हर्षद कोरपे, विजय तोडकर, प्रशांत आप्पा तक्ते, सोनू चुनके, संतोष चुनके, नामदेव गवळी,नितीन चुनके, मनोज जंगम, अशोक बिदरी,करण वाडकर, सिद्धेश गुळवे आदींसह मोठ्या संख्येने लिंगायत समाज, जंगम व गवळी समाज बांधाव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here