मनमाड शहर वंचित बहुजन आघाडी तर्फे संविधान प्रताविका वाचन करून शहरात शांतता संदेश देण्यात आले

0

मनमाड:-डॉ बाबा साहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्प अर्पण करून मनमाड वंचित बहुजन आघाडी तर्फे संविधान प्रताविका वाचन करून, शहरात शांतता संदेश देण्यात आले,दंगलीचे राजकारण हे कोणत्याही देशासाठी विकासाला अडथळा ठरतो यामुळे दंगली रोखणे ही आपली सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे. या करिता वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र च्या वतीने सर्वांना कळकळीचे आवाहन करण्यात आले आहे,दंगली पसरू देऊ नका,शांतता व बंधुता व सलोखा राखा,नोटबंदी आणि लॉकडाऊन मुळे सर्वसामान्य माणूस महागाईने व बेरोजगारीने होरपळुन गेला आहे. अशा वेळी धर्म आणि जातीच्या नावाने दंगली पेटवण्याचे षड्यंत्र काही जातीवादी शक्ती करत आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही आवाहन करत आहोत की आपापल्या परिसरात आपसातला सलोखा व कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवणे ही आपली जबाबदारी आहे.धार्मिक स्थळांवरचे भोंगे काढून टाका असा कायदा अथवा सर्वोच्च न्यायालयाचा कोणताही आदेश नाही. धार्मिक स्थळे असो की कार्यक्रम-समारंभ असो, पोलिसांची रीतसर परवानगी घेऊन, सायंकाळी दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत भोंगे वापरण्यास बंदीचा आणि शांतता झोन व सामान्य परिसरामध्ये विशिष्ट ‘डेसिबल’ तीव्रतेचा नियम पाळून लाऊडस्पीकर वापरण्यास, भोंगा अथवा लाऊडस्पीकर वापरण्यास परवानगी आहे. चक्क भोंगे काढूनच टाकने हा कायदेशीर वा समजदारीचा मार्ग होणार नाही. कोणत्याही धार्मिक स्थळी, उत्सव समारंभात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची कडक अंमलबजावणी करावी अशी आमची भूमिका आहे.राजकीय स्वार्थापोटी धार्मिक दंगली
पेटवणा-यांच्या षडयंत्राला बळी पडू नका.अफवा ही पसरवू नका.कायदा व सुव्यवस्था टिकवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी चे कार्यकर्ते आपल्या सोबत राहतील. कुठेही काहीही अनुचित प्रकार दिसून आल्यास आमच्या स्थानीक पदाधिकाऱ्यांना संपर्क साधा.आपल्या विभागात शांतता व कायदा-सुव्यवस्था टिकून ठेवण्यामध्ये आम्ही आपल्या सोबत पूर्ण सहकार्य करू असे शहरात शांतता संदेश देतांना वंचित बहुजन आघाडी तर्फे देण्यात आले, या वेळी,मनमाड शहरातील भारतीय बौद्ध महासभा शहरातील,फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच, मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समिती,अत्तार संघटना मनमाड,राहत फौंडेश मनमाड,ओबीसी अल्पसंख्यानक अराजकीय संघटना,अश्या असंख्य संघनांनी या कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला ,या वेळी,वंचित बहुजन आघाडी शहराध्यक्ष ऍड आम्रपाली ताई निकम,जिल्हा सचिव कादिर शेख, जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिंनगारे, जिल्हा नेते,कैलास शिंदे,यशवंत बागुल, सुरेश जगताप,गणेश एळींजे, अमोल केदारे,राकेश पगारे, दयानंद घोडके, गौतम कर्डक,बाप्पू सव्वाखंडे, संदीप खरे,संदीप घोडके,मछीन्दर भोसले,प्रवीन संसारे, निलेश निकम, अनवर मंसुरी, शंकर पवार,अतुल वानखेडे, विजय भालेराव,वाल्मिकी पाटील, संदीप जाधव, पाडूरंग पगारे,संतोष एळींजे इतर कार्यकर्ते उपस्तीत होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here